
*दापोली-* डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आयोजित आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सव ‘मयूरपंख २०२५’ मध्ये कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी-पालवण च्या विद्यार्थिनींनी लघु-नाटिका सांस्कृतिक या प्रकारामध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.
दिनांक १५ ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली येथे आयोजित ‘मयूरपंख २०२५’ या सांस्कृतिक कार्यक्रमात या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी “लघु-नाटिका” या प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला.यामध्ये कु. गायत्री मांगडे, कु. मृणाल ठाकरे, कु. ऋतुजा साळुंखे, कु. श्रद्धा डावले,कु. आर्या गायकवाड , कु. आर्या कोठावळे या विद्यार्थिनी सहभाग घेतला होता.
लघु-नाटिका” सादरीकरण करत असताना “आम्ही वेडे आहोत” या शीर्षकावर आधारित सादरीकरण केले. देशात महिला प्रत्येक क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर काम करत असताना देखील त्यांना कमी लेखले जाते मात्र या विद्यार्थिनींनी या नाटकाच्या स्वरूपात देशात घडत असलेल्या सर्वच ज्वलंत विषयांना हात घालत नाटकाचे सादरीकरण केले या सादरीकरणामध्ये देशभरात होत असलेले पक्ष फोडीचे प्रकार, आमदार-खासदारांचे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणारे प्रकार, लोकशाही, पत्रकारिता, विधायिका, हुकूमशाही, राजकीय व्यवस्था या सर्वच घटकांवर होत असलेल्या हल्ल्यामुळे भारतीय लोकशाही कशा पद्धतीने धोक्यात आलेली आहे. हे सर्व आपल्याला डोळ्यात देखत दिसून सुद्धा आपण कोणीही त्यावर जास्त बोलत नाही. म्हणूनच “आम्ही वेडे आहोत” अशी म्हणण्याची वेळ देखील आली आहे. खरे तर नाटकाच्या सादरीकरणाचा कोणताही अनुभव नसताना ज्या पद्धतीने विद्यार्थिनींनी स्वउत्स्फूर्तपणे नाटकाचे सादरीकरण केले ते खरंच कौतुकास्पदच म्हणावे लागेल. इतक्या ज्वलंत विषयांवर नाटकाचे सादरीकरण करणे तारेवरची कसरतच होती आणि त्याचे यश त्यांना स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे बक्षीस स्वरूपात देखील भेटले. कलेच्या माध्यमातून संस्कृती जोपासली जावी, समाजाची जागृती व्हावी, कला जोपासली जावी हा सांस्कृतिक कार्यक्रमांचा खरा हेतू असतो आणि हा हेतू या विद्यार्थिनींनी खरंच योग्य ठिकाणी मांडला त्या बद्दल त्यांचे देखील कौतुक करावे तेवढे कमीच म्हणावे लागेल.
या विद्यार्थ्यांच्या यशासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य श्री. बाळासाहेब सूर्यवंशी, सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक प्रशांत इंगवले, प्राध्यापिका सिद्धी फरांदे, प्राध्यापिका सिद्धि नाईक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*




