
*नाणीज, दि, १८:–* जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांचा जन्मोत्सव सोहळा श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे मंगळवारी (२१ ऑक्टोबर रोजी) मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे. त्यानिमित्त सोमवार, मंगळवार असे दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
या सोहळ्यासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक, भक्तगण, श्रद्धाळू उपस्थित राहणार आहेत.
*सात पायीदिंड्या क्षेत्री येणार* –
यावेळच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून सात उपपिठावरून सात वसुंधरा पायी दिंड्या निघाल्या आहेत. सर्वप्रथम नागपूरची दिंडी १२ सप्टेंबर २०२५ निघाली. मराठवाडा उपपीठ क्षेत्र परभणी येथून २८ सप्टेंबरला दिंडी निघाली. तेलंगणा उपापीठ कामा रेड्डी येथून २७ सप्टेंबर दिंडी निघाली. उत्तर महाराष्ट्र क्षेत्र नाशिक २९ सप्टेंबरला दिंडी निघाली. मुंबई उपापीठ क्षेत्र वसई येथून ४ ऑक्टोबर २०२५ रोजी दिंडी निघाली. गोवा उपपीठावरून १० ऑक्टोबर रोजी दिंडी निघाली. पश्चिम महाराष्ट्र उपपीठ पुणे येथून ६ ऑक्टोबरला दिंडी निघाली आहे. या सातही वसुंधरा पायी दिंड्या २० आणि २१ ऑक्टोबर रोजी नाणीजधाम येथे दाखल होतील.
*पर्यावरण जागृती आणि वृक्षारोपण* –
या पायी दिंड्या मजल दरमजल करत श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे पोहोचतील. त्या ग्लोबल वार्मिंगमुळे समाजाला होणारा त्रास आणि पर्यावरणाचे होणारे नुकसान याबद्दल जनजागृती करत करत येत आहेत. गेली तीन वर्षे हा उपक्रम सुरू आहे. वाटेत दिंड्यांचा मुक्काम होईल तिथे दररोज वृक्षारोपण केले जाते. वृक्ष लागवडीचे महत्व सांगितले जाते. प्लास्टिक व निसर्गाला हानी पोहोचवणाऱ्या वस्तूंचा वापर टाळण्यास सांगितले जातेय. दिंडीतील भाविकांच्या हातात प्रचार फलकही आहेत. यात्रिकांनी कपड्यावरही निसर्गरक्षणाच्या स्लोगन लिहिल्या आहेत.
याव्यतिरिक्त रामानंदाचार्य नरेंद्रचार्य यांच्या जन्मोत्सवानिमित्त दिंडी व्यतिरिक्त भक्तगणांनी दिनांक १६ ऑक्टोबर पर्यंत ७० हजार झाडे लावली आहेत. दिनांक २१ऑक्टोबर पर्यंत एक लाख झाडे लावण्याचा संकल्प भक्तगण पुरा करणार आहेत.
वसुंधरापायी दिंड्यांचा एकूण प्रवास १५५ दिवस झाला. या काळात एकूण ३६७४ किलो मीटर चालणे झाले. या वसुंधरा पायी दिंड्यांचे स्वागत रामानंदाचार्य दक्षिण पिठाचे उत्तराधिकारी परम पूज्य कानिफनाथ महाराज हे दिनांक वीस तारखेला नाणिजधाम येथे नागपूर पीठ, मराठवाडा पीठ, गोवा पीठ, मुंबई पीठ या दिंड्यांचे स्वागत करते.
तर २१तारखेला तेलंगणा पीठ, नाशिक पीठ आणि पुणे या दिंड्यांचे स्वागत करतील.
*यागाने उत्सवाची सुरुवात* –
दि २१ रोजी वाढदिवसानिमित्त श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे अनेक कार्यक्रम होणार आहेत.
सोमवारी सोहळा सुरू होईल. सकाळी नैमित्तिक पूजाविधिनंतर सोहळा सुरू होतो. दहा वाजता सप्तचिरंजीव २० ऑक्टोबर रोजी सकाळी महामृत्यूंजय याग व अन्नदान विधी सुरू होईल. त्यानंतर प्रवचनकार पदवीदान कार्यक्रम होईल. श्रीक्षेत्री पोहोचलेल्या पायी दिंड्यांचे स्वागत केले जाईल.
निमंत्रण मिरवणुका –
सकाळी दहापासूनच नाथांचे माहेर, प्रभू रामचंद्र मंदिर, वरदचिंतामणी मंदिर येथील देवताना सोहळ्याचे निमंत्रण मिरवणुकीने जाऊन देण्यात येणार आहे. श्रींच्या पालखीचे स्वागत होईल.
सोहळा नयनरम्य –
मंगळवार हा सोहळ्याचा मुख्य दिवस असेल. जन्मोत्सव सोहळा हा दिवस म्हणजे आनंद सोहळा असतो. अतिशय नयनरम्य असा हा सोहळा पाहण्यासारखा असतो. यादिवशी महामृत्युंजय यागाची समाप्ती होईल. चरण दर्शन, पायीदिंडीतील यात्रींचे स्वागत, पालखीचे स्वागत, दिवाळी पहाट लक्ष्मी पूजन, संगीत आदी कार्यक्रम होतील.
*रात्री प्रवचन आणि औक्षण*
रात्रौ साडेसात वाजता प.पू. कानिफनाथ महाराज यांचे प्रवचन होईल. साडेआठला जगद्गुरू नरेंद्राचार्यजी यांचे अमृतमय प्रवचन होईल. त्यानंतर जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी यांचे औंक्षण व अभिष्टचिंतन होईल. औक्षणाचा हा सोहळा अतिशय नयनरम्य असतो
*दोन्ही दिवस चोविस तास महाप्रसाद आणि आरोग्य शिबिर*
२० ऑक्टोबर रोजी पहाटे पाच ते २३ ऑक्टोबर दुपारी १२ पर्यंत महाप्रसाद आहे. २० ते २२ ऑक्टोबर या कालावधीत आरोग्य शिबिर होईल. २२ रोजी गुरुकृपा यज्ञ सोहळा आहे. यावेळी ७ पिठावरील पादुकांची विधियुक्त शक्ती स्थापना होईल.
७ ही पिटांच्या पादुका जगद्गुरु श्रींचा जुना आश्रम येथे मुक्कामी जातील. रात्रभर भजन, नामस्मरण अशा अध्यात्मिक वातावरणामध्ये विसावतील. दिनांक 23 ऑक्टोबर रोजी या सर्व पायी दिंड्या आपापल्या पिठांकडे प्रस्थान करतील अशाप्रकारे तीन दिवस चाललेल्या कार्यक्रमाची सांगता होईल.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*




