
कोकणात वैभव खडेकर यांचा लांबलेला भाजप पक्षप्रवेश हा सर्वाधिक चर्चेचा मुद्दा ठरला होता…
*मुंबई-* भाजप प्रवेशाचा मुहूर्त आधी दोन वेळा रद्द झाला आणि नंतर मोठ्या काळासाठी रखडला, मात्र अखेर, मंगळवारी मनसेतून हकालपट्टी झालेले नेते वैभव खेडेकर यांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती धरला. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कोकणातील शिलेदार अशी ख्याती असलेले खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतला होता. खेडेकरांचा पक्षप्रवेश व नगरपरिषदेच्या होणाऱ्या निवडणुका हा योगायोग जुळून आला आहे. त्यामुळे वैभव खेडेकर यांची पत्नी वैभवी खेडेकर यांचं नाव आता खेड नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी चर्चेत आहे.
खेडेकर यांच्या नशिबाने खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे ही बाब खेडेकर यांच्या पथ्यावर पडली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र खेडेकर व मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने झालेल्या या पक्षप्रवेशानंतर वैभव खेडेकर यांची वर्णी महामंडळावर लावण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. पक्षश्रेष्ठींकडून खेडेकर यांना तसा शब्द देण्यात आल्याचीही चर्चा आहे.
खेडेकर यांचा पक्षप्रवेश आजवर दोन वेळा रद्द झाला होता. त्यामुळे कोकणात वैभव खडेकर यांचा भाजप पक्षप्रवेश हा सर्वाधिक चर्चेचा मुद्दा ठरला होता. चार वर्षांनी होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप वेगळी लढल्यास विधानसभा निवडणुकीला उमेदवारी मिळावी, यासाठी आतापासूनच बाशिंग बांधून बसलेल्या मतदारसंघातील काही स्थानिकांचाही खेडेकरांच्या पक्षप्रवेशाला विरोध असल्याची चर्चा रंगली होती. इतकंच नाही तर राज ठाकरे यांच्याकडूनही हा भाजपा पक्षप्रवेश थांबवण्यात आल्याचीही चर्चा होती. मात्र या सगळ्या चर्चांना फाटा देत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश मुंबई येथे झाला आहे.
रत्नागिरीतील अनेक पक्षातील नेत्यांचा प्रवेश…
खेडेकर यांच्याबरोबर अनेक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेश सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील, माजी आमदार विनय नातू, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, केदार साठे आदी यावेळी उपस्थित होते .खेडेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
प्रवेश करणाऱ्यांमध्ये सुबोध जाधव, संतोष नलावडे, सुरेश सावंत, विलास जाधव, मनिष खवळे, मिलिंद नांदगांवकर, संजय आखाडे, रहीम सहीबोले आदींचा समावेश आहे.भाजपात या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नवी समीकरणे तयार होण्याची चिन्हे दिसत असून, आगामी निवडणुकांपूर्वी खेड तालुक्यातील राजकीय वातावरण अधिक तापणार आहे.
कोकणातील मनसेचे माजी नेते आणि खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी अखेर भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी खेडेकर यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनीही कमळ हाती घेतलं, ज्यामुळे कोकणातील भाजपची ताकद अधिक वाढली आहे.
वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश गेल्या काही महिन्यांपासून रखडला होता. तब्बल तीन वेळा पक्षप्रवेशाचा मुहूर्त पुढे ढकलला गेला होता. प्रत्येकवेळी काही ना काही कारणांमुळे समारंभ रद्द किंवा पुढे ढकलण्यात आला, त्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर आज त्यांच्या प्रवेशाने त्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
खेडेकर हे मनसेचे जुने आणि कोकणातील प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची प्रतिमा होती. मात्र अलीकडच्या काळात त्यांची भाजप आणि शिंदे गटाशी जवळीक वाढत गेली. त्यानंतर मनसेने त्यांच्यावर कारवाई करत पक्षातून बडतर्फ केले होते.
भाजप प्रवेश लांबत असल्याने खेडेकर स्वतः मुंबईत येऊन रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर यांच्यासह पक्ष नेत्यांची भेट घेत होते. शेवटी आज अखेर त्यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला.
राजकीय वर्तुळात या प्रवेशाकडे केवळ वैभव खेडेकर यांचे वैयक्तिक पुनरागमन म्हणून न पाहता, कोकणात भाजपची घडी मजबूत करण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून पाहिले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाला विशेष महत्त्व मिळत आहे.
कोण आहेत वैभव खेडेकर?
वैभव खेडेकर हे राज ठाकरे यांचे कोकणातील महत्त्वाचे शिलेदार मानले जात. राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केल्यापासून ते त्यांच्याबरोबर होते. इतकंच नाही तर राज्यातील पहिली खेड नगरपरिषद निवडून आणण्यात वैभव खेडेकर यांचा पुढाकार होता. ते खेडचे यापूर्वी नगराध्यक्ष राहिले आहेत. आंदोलनात थेट भिडणारा कार्यकर्ता अशी त्यांची खास ओळख आहे. युवावर्गामध्येही वैभव खेडेकर यांची मोठी क्रेझ आहे.
भाजपला कोकणामध्ये आजचा प्रवेश बळ देणारा ठरेल – रवींद्र चव्हाण
दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळवून देऊ, असा विश्वास खेडेकर यांनी व्यक्त केला. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.’विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्रासाठी समर्पित मोदी सरकार आणि महायुती सरकार जोमाने काम करत आहे. एक धडाडीचा कार्यकर्ता आणि मित्रत्व जपणारे वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश ही आनंदाची बाब आहे. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला कोकणात बळ मिळणार आहे,’ असे रवींद्र चव्हाण म्हणाले.
भाजपने मला आपलंसं केलं याचा आनंद आहे…
भाजप प्रवेशानंतर वृत्तवाहिन्यांची बोलताना वैभव खेडेकर म्हणाले, पक्षप्रवेश कोणी रखडवला हे एका बाईटमध्ये सांगण्यासारखं नाही. माझी सविस्तर मुलाखत घ्या, मी नक्की सांगेन. मात्र आज तो दिवस नाही. माझ्या देवाने स्वत:पासून दूर केलं, काही कारणं झाली असतील पण दुरावा निर्माण झाल्याचं दुःख आहे. आता जोमाने भाजप वाढवण्यावर आमचा भर असेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शतप्रतिशत भाजप करण्याचं आमचं लक्ष्य आहे.”
त्यांनी पुढे म्हटलं की, “मनसेतील अनेक नेत्यांसोबत भावनिक नाती होती, ती आज थांबत आहेत याचं दुःख आहे; पण भाजपनं मला आपलंसं केलं, याचा आनंदही वाटतो.”
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*






