
दीपक भोसले/संगमेश्वर- सह्याद्रीच्या घनदाट जंगलाने नटलेल्या संगमेश्वर तालुक्यातील वाशी-मुचरी रस्त्यावर अलीकडेच एका मोठ्या घोरपडीचे दर्शन झाल्याने निसर्गप्रेमींमध्ये उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे. घोरपडीसारखा दुर्मिळ आणि लाजाळू प्राणी रस्त्यावर दिसल्याने अनेकांनी फोटो आणि व्हिडीओ काढून सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सामान्यतः जंगलात लपून राहणारी घोरपड आता रस्त्यांवर दिसू लागल्याने जैवविविधतेसाठी हे एक गंभीर इशारा मानला जात आहे. स्थानिकांनी सांगितले की, अलीकडील काळात जंगल क्षेत्र कमी होत चालल्याने अशा वन्यप्राण्यांचे वास्तव स्थान बदलत चालले आहे. जंगल तोडीमुळे किंवा मानवी अतिक्रमणामुळे घोरपडीसारखे प्राणी आता मोकळ्या जागांमध्ये किंवा रस्त्यावर येताना दिसतात.
निसर्गप्रेमी आणि पर्यावरण कार्यकर्ते यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून त्यांनी जंगल संवर्धनावर अधिक भर देण्याची गरज व्यक्त केली आहे.
“सह्याद्रीचा जैवविविधतेचा खजिना आपण जपला नाही तर अशा प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येईल,” असे मत स्थानिक पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केले.
प्रशासनाकडूनही या भागात वन्यप्राण्यांचे निरीक्षण आणि जंगल क्षेत्राचे संवर्धन करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे, असेही मत स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केले.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*




