
रत्नागिरी: रत्नागिरीसह इतर तालुक्यात कामानिमित्त वास्तव्यास असणार्या इतर जिल्ह्यातील चाकरमानी मोठ्या संख्येने दिवाळीनिमित्त आपल्या गावी जात असतात. त्यामुळे या प्रवाशांची गैरसोय होवू नये, त्यांचा प्रवास चांगला, सुखकर व्हावा यासाठी रत्नागिरी एसटी विभागाच्या वतीने 16 ते 26 ऑक्टोबरच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात दररोज 15 ते 20 असे 200 जादा फेर्या सोडणार आहेत. त्याचे नियोजन झाले असून प्रवाशांचा प्रतिसाद पाहून आणखीन जादा बसेस सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
कित्येकजण कामानिमित्त, व्यवसाय, शिक्षण, नोकरीनिमित्त कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात आले आहेत. मात्र सणासुदीत येथील चाकरमानी आपल्या मूळ गावी हमखास जातोच. दिवाळीच्या पार्श्वभूमीर सर्वांनाच आपल्या गावाकडे जाण्याची ओढ असते. त्यासाठी प्रवाशी लालपरीलाच पसंती देतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होवू नये, त्यांचा चांगला व आरामदायी प्रवास होण्यासाठी रत्नागिरी एसटी विभागाच्या वतीने 200 हून अधिक जादा फेर्याचे नियोजन केले आहे.
जिल्ह्यातील चाकरमानी, प्रवाशांनी आताच तिकीट आरक्षण करून घ्यावे असेही आवाहन एसटी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता. मात्र राज्यातील पूरपरिस्थिती पाहता एसटीची हंगामी भाडेवाढ मागे घेण्याचे आदेश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी परिवहनमंत्री सरनाईक यांना दिले होते. त्यामुळे हंगामी भाडेवाढ रद्द झाल्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या ठिकाणी धावणार लालपरी…
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर तर विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, बुलढाणा या जिल्ह्यांत दिवाळीसाठी गाड्या धावणार आहेत.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*

