
शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मदतीसाठी सर्वतोपरी योगदान देऊया. या बांधवांना पुन्हा नव्याने, उमेदीने उभे करण्याचा निर्धार करूया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
मुंबई: विजयादशमीच्या सणाकडून प्रेरणा घेऊन आव्हाने, संकटावर मात करुया, असे आवाहन करतानाच, विजयादशमीचे हे पर्व राज्यातील नागरिकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो, अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्याही मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या.
विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन यांच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुभेच्छा देतानाच, राज्यात पावसामुळे अनेक भागात अभुतपूर्व बिकट परिस्थिती उद्भवली आहे. या संकटसमयी आपण सगळे एकजुटीने या आपत्तीग्रस्त नागरिकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहूया. शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मदतीसाठी सर्वतोपरी योगदान देऊया. या बांधवांना पुन्हा नव्याने, उमेदीने उभे करण्याचा निर्धार करूया, असे आवाहन केले.
‘विजयादशमीचा सण हा असत्यावर सत्याच्या विजयाचा संदेश घेऊन येतो. या सणाकडून सकारात्मक अशी ऊर्जा घेऊया. बिकट परिस्थितीवर मात करून, अडचणीतून मार्ग काढण्यात महाराष्ट्र नेहमीच पुढे राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून ते अनेक अग्रणींनी आपल्याला हाच वारसा-वसा दिला आहे. ही प्रेरणा घेऊन महाराष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी सज्ज होऊया. आपल्या सर्वांच्या एकजूटीतून महाराष्ट्र विकासाची पताका डौलाने फडकत ठेवण्यासाठी निर्धार करूया, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी संदेशात म्हटले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मचक्र प्रवर्तनातून विश्वाला सामाजिक समतेची दिशा दिली. हा दिवस अखंड विश्वासाठी चिरंतन प्रेरणादायी ठरो, अशी मनोकामनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
*दिल्लीची वाट न पाहता दिवाळीपूर्वी मदत देणार…*
राज्यभरातून सातत्याने ओल्या दुष्काळाची मागणी होत आहे, पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही, आजपर्यंत कधीही ओला दुष्काळ जाहिर झालेला नाही. पण ज्या वेळी दुष्काळ पडतो, त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण दिल्या जातात. तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे. असं समजून त्या सगळ्या सवलती यावेळी लागू करण्याचा केल्या जातील. दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. ” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते बोलत होते.
*दिल्लीची वाट न पाहता दिवाळीपूर्वी मदत देणार; देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन…*
दिल्लीने नुकसानभरपाईसंदर्भात पूर्ण मदत कऱण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारला मदत प्रस्तावासाठी दिल्लीला आकडे पाठवावे लागतात. मात्र अजूनही हे आकडे जमा करण्याचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत केंद्राच्या निर्णयाची वाट न पाहता राज्य सरकारकडून तत्काळ मदत सुरू केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*

