
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ- निसर्गयात्री संस्था यांच्यात सामंजस्य करार
*रत्नागिरी:* जागतिक पर्यटन दिनानिमित्त कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्प जतन संवर्धन तसेच प्रचार, प्रसार आणि प्रसिद्धीसाठी वैशिष्ट्यपूर्ण अमूल्य वारसा ठेवा जतन संवर्धन तसेच प्रचार, प्रसार आणि प्रसिद्धीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन आणि निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी यांच्या मध्ये सामंजस्य करार पार पडला.
संयुक्त राष्ट्र पर्यटन संस्थे अंतर्गत त्यांनी दिलेले घोष वाक्य “पर्यटन आणि शाश्वत विकास” यास अधीन राहून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जागतिक पर्यटन दिनाचा औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मार्फत प्रधान कार्यालय व संलग्नित सर्व प्रादेशिक कार्यालय, पर्यटक निवास येथे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
युनेस्को जागतिक वारसा स्थळ दर्जा मिळण्याच्या प्रक्रियेत समाविष्ट असलेली कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्प. भवितव्यात कोकण पर्यटन क्षेत्रात आणि त्याअनुषंगाने सर्वांगीण विकासात महत्वपूर्ण भूमिका निभावणार आहेत. एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटने सर यांनी रत्नागिरीस्थित कोकणातील कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे भेट दिली. तसेच त्यांच्या प्रमुख उपस्थितीत गणपतीपुळे येथे आयोजित कार्यक्रमात निसर्गयात्री संस्था, रत्नागिरीचे संस्थापक अध्यक्ष तसेच कोकणातील कातळशिल्प शोधकर्ते व अभ्यासक सुधीर रिसबूड रत्नागिरी आणि प्रादेशिक व्यवस्थापक एमटीडीसीचे दीपक माने या दोघांच्या स्वाक्षरीने हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.

या प्रसंगी गणपतीपुळे येथील एमटीडीसीचे रिसोर्ट चे व्यवस्थापक वैभव पाटील, गणपतीपुळे येथील पर्यटन व्यावसायिक केळकर, काळोखे व अन्य मंडळी तसेच निसर्गयात्री संस्थेचे सुधीर रिसबूड, ऋत्विज आपटे, अजिंक्य प्रभुदेसाई, तार्किक खातू आणि मकरंद केसरकर उपस्थित होते. तर पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राज्य मंत्री पर्यटन इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली प्रधान सचिव पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र डॉ. अतुल पाटणे, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटने यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन महाव्यवस्थापक एमटीडीसी चंद्रशेखर जयस्वाल यांनी केले.
जागतिक पर्यटन दिन उपक्रमात विविध स्पर्धेत यशस्वी स्पर्धकांना व्यवस्थापकीय संचालक नीलेश र. गटणे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. अनुभवात्मक पर्यटन अंतर्गत एमटीडीसी गणपतीपुळे व रत्नागिरी येथे येणारे पर्यटक यांच्यासाठी कातळशिल्प ला भेट देण्यासाठी सुधीर रिसबूड, कातळपशिल्प इतिहासकार यांचा समवेत करण्यात आला. एमटीडीसी विजयदुर्ग पर्यटक निवास डागडुजी नंतर नव्याने पर्यटकांसाठी व्यवस्थापकीय संचालक नीलेश र. गटणे यांच्या हस्ते उघडण्यात आले. प्रादेशिक कार्यालय पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, रत्नागिरी यांच्या अखत्यारीत पर्यटकांचे स्वागत, शाळकरी मुलानं साठी चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आले. विविध महाराष्ट्र राज्यात असलेले एमटीडीसी पर्यटक निवासात पर्यटकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
प्रधान कार्यालय अंतर्गत वेबिनार श्रृंखला राबविण्यात आली ज्यात डॉ. राज्य पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे हॉटेल रिसॉर्टचे प्रख्यात वास्तुविशारद खोझेमा चितलवाला व वन्यजीव पर्यटन एक्सपर्ट संजय देशपांडे यांचे व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.प्रधान कार्यालय मुंबई अंतर्गत जय हिंद महाविद्यालय, इंडियन मर्चंट चेंबर, विविध महाविद्यालय येथे एमटीडीसीच्या संयुक्त विद्यमानाने चर्चासत्र व परिसंवाद आयोजित करण्यात आले. प्रादेशिक कार्यालयातर्फे हेरिटेज वॉक, व्याख्याने आयोजित करण्यात आली. निसर्ग भ्रमण, पर्यटकांचे मनोगत, व्हिलेज टुरचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, राज्यभरातील या कार्यक्रमांची आखणी आणि आयोजन साठी महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, अधीक्षक अभियंता शैलेंद्र बोरसे, उपसचिव संतोष रोकडे, उपसचिव विजय पोवार, मुख्यलेखा अधिकारी जितेंद्र सोनवणे, वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक नागपूर दिनेश पाटील, वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक पुणे हनुमंत हेडे , प्रादेशिक व्यवस्थापक नाशिक जगदीश चव्हाण, प्रादेशिक व्यवस्थापक छत्रपती संभाजीनगर दीपक हर्णे, प्रादेशिक व्यवस्थापक अमरावती मौसमी कोसे,प्रादेशिक व्यवस्थापक रत्नागिरी दीपक माने, प्रसिद्धी प्रमुख मानसी ताटके, उमेश राजपूत, शर्वरी भावे, वैभव पाटील, सिद्धेश चव्हाण, धीरज चोपडेकर, राजेंद्र पाटील, विजय शेरकी , लक्ष्मीकांत गुडेवार, सदानंद दाभाडे, मितेश रामटेके, साहिल भालेराव, किशोर जाधव, किशोर उगले, सुदर्शन घरत यांनी केली.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…

