
चिपळूण: संगमेश्वर तालुक्यातील शिवधामापूर येथून २३ सप्टेंबर रोजी बेपत्ता झालेल्या अपेक्षा अमोल चव्हाण (वय ४०) यांचा मृतदेह आज (२५ सप्टेंबर) सकाळी 11.30 वाजता कालूस्ते खाडीत आढळून आला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
२४ सप्टेंबरच्या रात्रीच गांधारेश्वर पुलावर अपेक्षांच्या चप्पल, पर्स आणि मोबाईल फोन सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र मृतदेह सापडला नसल्याने दोन दिवसांपासून गावात उलटसुलट चर्चा सुरू होत्या. पोलिसांनी सातत्याने शोध सुरू ठेवत गुरुवारी सकाळी चिपळूणचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक राठोड, पोलिस हेड कॉन्स्टेबल आशिष बल्लाळ आदी टीम घटनास्थळी पोहोचली. पुन्हा तपास घेतला आणि सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास कालुस्ते खाडीत तिचा मृतदेह सापडला.
सविस्तर वृत्त असे की, अपेक्षा २३ सप्टेंबर रोजी कोणालाही न सांगता घरातून निघून गेल्याची तक्रार पतीने संगमेश्वर पोलिस ठाण्यात नोंदवली होती. मोबाईल लोकेशनची पडताळणी केली असता तिचे शेवटचे लोकेशन गांधारेश्वर पुलावर आढळले. त्यानंतरच शोधमोहीम सुरू झाली होती.
पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे की कौटुंबिक वादातून तिने टोकाचा निर्णय घेतला असावा. संपूर्ण घटनेचा तपास पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या आदेशानुसार संगमेश्वर पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय साळवी व पथक करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे शिवधामापूर परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांकडून अपेक्षाच्या अकाली निधनाबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*