
राजापूर : लांजा तालुक्यातील मौजे कुर्णे येथील राखीव वनक्षेत्रात सागवानाची मोठ्या प्रमाणावर अवैध तोड झाल्याचे उघड झाले आहे. राजापूर वन विभागाने या प्रकरणी सात संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात ३१ सागवानची झाडे, अंदाजे ३.१४ लाख रुपयांचा बाजारभाव असलेला माल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली क्रेन जप्त करण्यात आल्याची माहिती असे राजापूर वन विभागाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
वन विभागाच्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट २०२५ रोजी लांजा तालुक्यातील कुर्णे येथील जंगल सर्व्हे नं. १९१/१ मध्ये जंगल फिरती करत असताना वनपाल लांजा व वनरक्षक लांजा यांना अवैध सागवन तोड झाल्याचे निदर्शनास आले. त्यातील काही माल जागेवर मिळाला तर काही माल गायब करण्यात आल्याचे निदर्शनास आले. यानंतर भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) फ प्रमाणे गुन्हा क्र. ३०३/२०२५ नोंदवण्यात आला. तपासानुसार, २४ सप्टेंबर २०२५ रोजी मनोज संजय पाटणकर, मंदार संजय पाटणकर, अजय नागूप्रसाद निषाद, शत्रुघ्न दत्ताराम गोठणकर, विजयकुमार रामशंकर निषाद, मंदार मनमोहन बारस्कर व शुभम रवींद्र गुरव या सात संशयितांना यावेळी ताब्यात घेतले गेले.
त्यांनी सांगितले की, सागाचे झाड ट्रकमध्ये भरुन कुर्णे ते कुंभवडे येथे नेण्यात आले आणि नंतर माडबनकडे जाणाऱ्या कसबा मिठगवाजवळील पठार येथे लपवण्यात आला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या ३१ साग झाडांचे अंदाजे वजन ७.४९५ घ.मी. असून, बाजारभावाने त्याची किंमत अंदाजे ३,१४,७९० रुपये आहे. वनरक्षक लांजा यांच्याकडे सुरक्षिततेसाठी ताबा देण्यात आला आहे. तसेच, चोरीसाठी वापरलेली क्रेन क्रमांक एमएच ०९ जीएम ०४५२ देखील जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर गुरुप्रसाद, विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार, वनपाल जयराम बावदाणे, वनरक्षक विक्रम कुंभार व अन्य कर्मचारी सहभागी होते.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*

