
*मुंबई-* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पेशवे काळातील शहाणे असल्यासारखे वागत आहेत, अशी जहाल टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीवरून त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. तर पेशवे काळात नाना फडणवीस ज्या पद्धतीने भाषा दाखवत होते, त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीस हे ‘ओला दुष्काळ’ असा शब्द नाही म्हणत आहेत.
राऊत यांनी स्पष्ट केले की, ‘ओला दुष्काळ’ हा जरी शासकीय दस्तऐवजातील शब्द नसेल, तरी सरकार हे लोकभावनेवर चालते. आमदार देशमुखांनी काल सांगितल्याप्रमाणे, ओला दुष्काळ जाहीर करावा ही लोकभावना आहे आणि सरकारने त्या भावनेचा आदर करावा, असे मत राऊत यांनी व्यक्त केले. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार केवळ शब्दांच्या खेळात गुंतले आहे, असा आरोप राऊत यांनी केला आहे.
*सत्ताधारी खोटं बोलत आहेत*
संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी काल मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय उद्धव ठाकरे यांची वाट पाहत होते. मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. 36 लाख शेतकऱ्यांचे मराठवाड्यात नुकसान झाले आहे. त्यांना निवारा नसल्याने ते निर्वासीतसारखे राहत आहेत, त्यांच्यापर्यंत सरकारी मदत पोहोचलेली नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यावर जाऊ नका. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री खोटे बोलत आहे. शेतकऱ्यांपर्यंत अधिकारी आणि मदत पोहोचलेली नाही. अनेक घरांमध्ये पाणी साचले असून काही जणांची घरं वाहून गेली आहेत.
*फडणवीसांनी लावलेले निकष चुकीचे*
संजय राऊत म्हणाले की, शेतीमध्ये नद्यांचा प्रवाह वळला आहे. त्यामुळे शेती राहिलेली नाही. यानंतर आपला बांध कुठे हे देखील समजणार नाही. शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितले की तुम्ही केलेल्या कर्जमाफी मुळे आम्ही इथपर्यंत आलो आहोत. आता जर कर्जमाफी केली नाही तर आमचे जगणं अवघड होईल. उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी लावलेले निकष अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 3 ते 4 हजार रुपयांची मदत मिळेल ती पण हाती कधी पडेल सांगता येत नाही.
*पी-एम केअर फंडातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा*
संजय राऊत म्हणाले की, आता आपल्या सरकारकडे पैसे नाहीत, तिजोरी रिकामी आहे. ठेकेदारांकडून आलेला पैसा हा तिजोरीत गेलेला नाही. हा सर्व पैसा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे गेला आहे. तो लोकांपर्यंत जाणार नाही. मग पैसा आणायचा कुठून. मुख्यमंत्री टोला-वा टोल-वी करत आहेत, पैशांचे सोंग आणता येणार नाही असे उपमुख्यमंत्री म्हणत आहेत. पी-एम केअर फंड हा सरकारी आहे की खासगी आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही. पण त्यामध्ये जी रक्कम आहे ती देशाच्या बजेट पेक्षा जास्त असावी असे लोकांचे म्हणणे आहे. पी-एम केअर फंडामध्ये मुंबई सारख्या शहरातून सव्वादोन लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. महाराष्ट्रातील अनेक कंपन्यांनी त्यासाठी पैसे दिले तर आमची मागणी आहे की पी-एम केअर फंडातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे.
*म्हणून सरकारी लोकं पळून गेले*
संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे दोन उपटसुंभ आहेत त्यांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे हे सांगावे. आम्ही जेव्हा काल फिरलो तेव्हा लोकांच्या डोळ्यात संताप आम्ही पाहिला आहे. आम्हाला भीती वाटली की लोकांच्या डोळ्यात संताप होता. जनता सरकारला गावात येऊ देणार नाही म्हणून हे लोकं बाहेरच्या बाहेर पळून गेले. धाराशिव मधील एका गावात गेलो तिथे सरकारची मदत नाही, स्थानिक आमदाराने मदत दिली नाही, पण शिवसेनेची मदत पोहोचली होती. तिथे आमदार कोण आहेत हे विचारले तेव्हा लोकांनी संतापत तानाजी सावंत नावाचे आमदार आहेत असे सांगितले. गाव पाण्यात आणि तानाजी पुण्यात अशा घोषणा शेतकरी देत होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत एक चक्कर मारली बाकी ते पुण्यातच आहे, आणि आम्हाला कशी मदत करायची हे शिकवत आहे.
*सरकारी मदतीत घोटाळा होऊ शकतो*
संजय राऊत म्हणाले की, सरकारची मदत जर पुढील काळात मिळाली नाही तर जनता जो निर्णय घेईल त्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल. दिवाळीपूर्वी मदत पोहोचली नाही तर जनतेसोबत उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरणार आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एक मोर्चा काढणार आहोत त्यांचे नेतृत्व उद्धव ठाकरे करणार आहेत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. सरकारने आम्हाला तुटपुंजी मदत पाठवली तरी सुद्धा अधिकारी इतके मस्तवाल आहे की ती आमच्यापर्यंत पोहचणार नाही ते आमचा छळ करतील, असे शेतकरी म्हणत आहेत. तर सरकारी मदती मध्ये मोठा घोटाळा होण्याची शक्यता आहे, असे राऊतांनी म्हटले आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*

