संगमेश्वर : संगमेश्वर ग्रामीण रूग्णालय अजब कारभारामुळे सातत्याने चर्चेत असते. आता पुन्हा एकदा रूग्णालयाचा ढिसाळ कारभार वेशीवर टांगला गेला आहे. जे घडले ते धक्कादायक असून ग्रामीण रूग्णालयात दाखल असलेल्या एका गरोदर महिलेला, अन्य रूग्णांना रूग्णालयातील कॅन्टीन चालकाने तब्बल तीन दिवस नाश्ता आणि जेवण दिलेच नाही. त्यामुळे या कॅन्टीन चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच रूग्णालय व्यवस्थापनाला या गैर व्यवस्थेबाबत जाब विचारावा आणि कारवाई करावी अशीही मागणी होत आहे.
जाहिरात