
नाशिक- त्र्यंबकेश्वरमध्ये गुंडांकडून पत्रकारांना बेदम मारहाण झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. यात तीन पत्रकार जखमी झाले आहेत. त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ केंद्र जवळील गाड्यांच्या प्रवेशाची पावती घेणाऱ्या गुंडांकडून ही मारहाण झाली असून जखमी पत्रकारांवर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयात जाऊन जखमी पत्रकारांची भेट घेत विचारपूस केली. तसंच पोलिसांना गुंडांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
पत्रकारांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्र्यंबकेश्वर येथे साधुमहंतांची बैठक असल्याने त्यासंदर्भातील माहिती मिळवण्यासाठी नाशिकहून प्रादेशिक वृत्तवाहिनीचे पत्रकार त्रंबकेश्वरमध्ये वाहनाने जात असताना, श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या नावाने करवसुली करणाऱ्या मुलांनी पत्रकारांच्या गाड्या अडवल्या. पत्रकार आहोत असं सांगूनही त्यांनी जाऊ दिलं नाही आणि गाड्या बाहेरच ठेवण्यास सांगितलं. बराचवेळ समजावण्याचा प्रयत्न करूनही त्या मुलांनी उद्धट बोलणं सुरूच ठेवलं. मात्र, तुमची गाडी कोणत्याही परिस्थितीत जाऊ दिली जाणार नाही असं म्हणत पत्रकारांना दगड, काठ्या आणि छत्रीने मारहाण करण्यास सुरुवात केली. यात पत्रकार किरण ताजणे, योगेश खरे, अभिजीत सोनवणे जखमी झाले आहेत. किरण ताजणे यांना डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना तातडीने नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
त्र्यंबकेश्वर प्रवेशद्वाराजवळ आमची गाडी अडवली आणि पावतीचे पैसे द्या असं सांगितलं. आम्ही पत्रकार असून वृत्तांकन करण्यासाठी चाललो आहे असं सांगत आम्ही त्यांना जाऊ द्या अशी विनंती केली. मात्र, त्यांनी शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. लाकडी दांडे, छत्री आणि दगडाने आम्हाला मारहाण केली अशी माहिती, जखमी पत्रकार किरण ताजणे यांनी दिली. पत्रकारांवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच मंत्री छगन भुजबळ यांनी खासगी रुग्णालयात जाऊन जखमी पत्रकार किरण ताजणे यांची भेट घेत विचारपूस केली. त्रंबकेश्वरमध्ये जाण्यासाठी कसली करवसुली करतात. ती अधिकृत आहे की अवैध याची चौकशी झाली पाहिजे. तसंच करवसुली करण्यासाठी गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींची नेमणूक केली कशी? याची कल्पना पोलिसांना नव्हती का? असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित करत गुंडांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी असे आदेश दिले आहेत. पत्रकारांना मारहाण झाली म्हणून ही माहिती बाहेर आली. देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांना हे गुंड कशा पद्धतीने वागणूक देत असतील? त्यांना काही न्याय मिळत असेल याबाबतही भुजबळांनी शंका व्यक्त केली आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा
आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..
“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…

