
कीव- रशियाने युक्रेनच्या विविध शहरांवर मोठा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. रशियन सैन्याने शनिवारी विविध ठिकाणांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले, ज्यामध्ये किमान तीन लोक ठार झाले असून, अनेकजण जखमी झाले आहेत. युक्रेनियन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रशियाने किमान ६१९ ड्रोन आणि ५० हून अधिक बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रांचा वापर केला.
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी अधिकृत टेलिग्राम अकाउंटवरील निवेदनात म्हटले म्हणाले की, हे हल्ले नऊ प्रदेशांमध्ये झाले, ज्यात डनिप्रोपेट्रोव्स्क, मायकोलाईव्ह, चेर्निहिव्ह, झापोरिझिया, पोल्टावा, कीव, ओडेसा, सुमी आणि खार्किव यांचा समावेश आहे. रशियाला आमच्या पायाभूत सुविधा, निवासी क्षेत्रे आणि गैर-सरकारी आस्थापनांना उद्ध्वस्त करायचे होते. हे हल्ले आमच्या नागरिकांना घाबरवण्याच्या आणि पायाभूत सुविधा नष्ट करण्याच्या रशियाच्या रणनीतीचा भाग आहेत.
झेलेन्स्की पुढे म्हणाले की, पुढील आठवड्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर हा मुद्दा उपस्थित करणार आहे. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्थानिक गव्हर्नर सेर्ही लिसाक यांनी सांगितले की, युक्रेनच्या मध्यवर्ती डनिप्रोपेट्रोव्हस्क प्रदेशात झालेल्या हल्ल्यात किमान २६ लोक जखमी झाले आहेत. तर, पूर्वेकडील डनिप्रो शहरात अनेक उंच इमारती आणि घरांचे नुकसान झाले. युक्रेनच्या लष्कराने ५५२ ड्रोन, दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि २९ क्रूझ क्षेपणास्त्रे पाडल्याचा दावा केला आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर


अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा
आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..
“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…