
दापोली : तालुक्यातील केळशी किनारा मोहल्ला येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल चार लाख रुपये किमतीचे ९९८ ग्रॅम चरस जप्त केले आहे. या प्रकरणी अबार इस्माईल डायली (वय ३२) या व्यक्तीला अटक करण्यात आली. त्याच्या घराच्या मागील पडवीत हे चरस ठेवण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. त्यावेळी घराच्या मागील बाजूस प्लास्टिकच्या पिशवीत संशयास्पद पदार्थ आढळला. हा पदार्थ गडद लाल आणि सोनेरी रंगाच्या वेस्टनात असून, त्यामध्ये हिरव्या रंगाचे दुसरे वेस्टन होते. आतमध्ये तपकिरी रंगाचा, तीव्र वासाचा ९९८ ग्रॅम चरस प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळलेला होता.


पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, या अमली पदार्थाची बाजारातील किंमत सुमारे चार लाख रुपये आहे. या कारवाईसाठी पोलिस निरीक्षक महेश तोरसकर, उपनिरीक्षक यादव, उपनिरीक्षक पाटील, हेडकॉन्स्टेबल मोहिते, ढोले, तसेच कॉन्स्टेबल भांडे, टेमकर, दिंडे आणि एल.पी.सी. पाटेकर यांनी परिश्रम घेतले.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर