
रत्नागिरी संगमेश्वर /अर्चिता कोकाटे: संगमेश्वर तालुक्याचे पोलीस निरीक्षक श्री राजाराम चव्हाण यांनी योग्य पद्धतीने केलेल्या नियोजनामुळे गेली अनेक वर्ष होणारी वाहतूक कोंडी यावर्षी झाली नाही. प्रवाशांचे होणारे हाल त्यामुळे कमी झाले. योग्य पद्धतीने केलेल्या नियोजनाबद्दल संगमेश्वर मध्ये पोलीस निरीक्षक यांचे कौतुक करण्यात येत आहे.
दरवर्षी होणारी वाहतूक कोंडी थांबवण्यासाठी पोलिसांचे योग्य नियोजन…
यावर्षी कोकणातील संगमेश्वर येथील गणेशोत्सव कालावधीत सोनवी पुलाजवळ वाहतुकीची होणारी कोंडी रोखण्यासाठी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी नियोजनबद्ध पद्धतीने पोलीस यंत्रणा राबवून मुंबई पुणे येथून येणाऱ्या चाकरमान्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी काळजी घेतली आहे. येणाऱ्या चाकरमान्यांची योग्य पद्धतीने केलेल्या नियोजनामुळे संगमेश्वर पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.
मुंबई गोवा हायवे होणारी वाहतूक कोंडी फोडण्यामध्ये संगमेश्वर पोलिसांची दमदार कामगिरी…


संगमेश्वर पोलीस पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितले की संगमेश्वर मध्ये होणारी वाहतूक कोंडी पूर्ण अभ्यास करण्यात आला होता. दोन्ही बाजूंनी एकेरी वाहतूक करण्यामध्ये आम्ही नियोजन केले होते आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. तसेच पैसा फंड हायस्कूल येथून मुंबईहून येणारी गाड्या तीन मिनिटे थांबवण्याचे नियोजन केले होते. आणि आणि रत्नागिरी कडून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या गणेश कृपा हॉटेलचे येथे दहा मिनिटे थांबवण्याचे नियोजन करण्यात आले होते. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पोलीस स्थानकातील आमचे कर्मचारी, पोलीस पाटील व प्रशासकीय अधिकारी तसेच स्थानिक ग्रामस्थ केलेल्या सहकार्यामुळे हे सहज शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी होणाऱ्या वाहतूक कोंडी वरती मोठ्या गाडीने प्रवास करणे शक्य नसल्याने सायरन वाली टू व्हीलर इतर ठिकाणाहून मागून घेण्यात आलेली होती. चाकरमान्यांनी आमच्या नियोजनांना केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभारी मानले.


सामाजिक कार्यकर्ते दिनेश आंब्रे यांच्याकडून पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण सत्कार…
मुंबई गोवा हायवे च्या वाहतूक कोंडी वर केलेल्या नियोजनाबद्दल आणि जेष्ठ नागरिकांच्या शासनाच्या जागृती जागृती अभियान अंतर्गत प्रतिसाद उपक्रमामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल यामुळे पो. नी. राजाराम चव्हाण यांचा सामाजिक कार्यकर्ते व कायदा साथी दिनेश अंब्रे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गावित यांना पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.
अखिल विश्व गायत्री परिवार हरिद्वार यांच्याकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून सुधीर माने यांनी पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांचा पुस्तक देऊन सत्कार केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी मुंबई गोवा हायवे वरती होणाऱ्या कामावरती पोलीस निरीक्षक चव्हाण साहेब यांच्याशी चर्चा केली. तसेच सदर कामासंदर्भामध्ये जातीनिशी लक्ष देऊन कामांमधील अडचणीत दूर करण्याचे साहेबांनी सांगितले.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर