
संगमेश्वर प्रतिनिधी- कोंड असुरडे (ता. संगमेश्वर) येथील ७ वर्षीय *सचिन विनीत खेडेकर* याला *“मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार २०२५”* या राज्यस्तरीय मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. या उल्लेखनीय यशाबद्दल संगमेश्वर पंचक्रोशी वैश्य समाजातर्फ सचिन याचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. यावेळी समाजातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
खेडेकर कुटुंबीयांनी समाजाच्या प्रेमासाठी आभार व्यक्त करत, सचिनच्या पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद देण्याची विनंती केली.

🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर