
रत्नागिरी: गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासासाठी एस.टी. प्रवाशांचा मोठा ओघ सुरू झाला असून, रत्नागिरी, मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, देवरूख, लांजा आणि राजापूर येथील सर्व आगारांमधून सुटणाऱ्या जादा एस.टी. बसेसचे आरक्षण फुल्ल झाले आहे.
गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासासाठी सुखकारक व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून एकूण २,५०० जादा एस.टी. बसगाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. या आरक्षणास प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने सर्व बसेसचे आरक्षण भरले गेले आहे, अशी माहिती प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी यांनी दिली.


सध्या गणपती विसर्जनानंतर दोन दिवस शिल्लक असतानाही बससेवेची मागणी अधिक वाढत असल्याने, आवश्यकतेनुसार आणखी जादा बसेस उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू असल्याचे बोरसे यांनी स्पष्ट केले.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर