
*संगमेश्वर: अर्चिता कोकाटे/ नावडी-* संगमेश्वर परिसरात मंगळवारी गणेश भक्ताने मोठ्या जल्लोषात साश्रू नयनानी ” गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या “अशा भावपूर्ण जयघोषात गजरात व जल्लोषात बाप्पांना निरोप दिला.
हात गाड्या सुशोभीकरण करून तसेच काहींनी डोक्यावर घेऊन तर काहींनी आपल्या खाजगी वाहनातून बाप्पांना गद्रे पागाळी घाट, रामपेठ शास्त्री नदीवरील घाट तसेच एसटी स्टँड पाठीमागील हनुमान मंदिर घाटावर आरत्या करून व जयघोष करून बाप्पांना जड अंतकरणाने निरोप दिला.
यावेळी बालके व युवकांनी फटाक्यांची आतीशबाजी केली. पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवून अनेक घाटावर भेटी दिल्या.



गद्रे घाटावर महिला पोलिस अंमलदार क्रांती सावंत, महिला होमगार्ड मोरे,महिला पोलीस व होमगार्ड सर्व पोलीस अधिकारी यांनी विविध घाटावर उत्कृष्ट सेवा बजावली. कोणताही अनुचित प्रकार न घडता गणेश भक्तांनी डोळ्यातून अश्रू पाझरत गणरायांना भक्ती पूर्ण निरोप दिला.
तर रामपेठ भागातील लहान मुलांनी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत तेथील घाटापर्यंत मिरवणूक काढली व पो. निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम बंदोबस्ताची अचूक कामगिरी बजावत असताना पोलिसांची प्रशंसनीय कामगिरीचे नागरिकांत कौतुकही केले जात आहे.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*