गणेशोत्सवामध्ये संगमेश्वरच्या कु. साहिल सुनिल आंबवकर याने कोकण रेल्वेचा देखावा साकारला…

Spread the love

संगमेश्वर – दिनेश आंब्रे.- कोकणात गणेशोत्सवाचे पर्व अतिशय जल्लोषात व उत्साहात सुरू झाले आहे. यामुळे गणेशभक्त युवक व लहान मुले गणेशासमोर वेगवेगळे देखावे उपक्रमात आहेत. सध्या या गणेशोत्सवानिमित संगमेश्वर ( नावडी ) येथील युवा उपक्रमशील गणेशभक्त साहिल सुनिल आंबवकर याने यंदाच्या चौथ्या वर्षी कोकण रेल्वेचा देखावा साकारून संगमेश्वरमधील नाविन्यपूर्ण सुशोभिकरण केलेल्या रेल्वेस्टेशनचे तसेच बससेवा, उक्षीचा धबधबा, उक्षी बोगदा व सह्यादीचा निसर्गरम्य परिसर इत्यादी दृश्ये एक महिना मेहनत करून कुटुंबियांच्या सहकार्याने केले आहे.


                  

यामध्ये साहिलचे मित्र सुशांत भोसले, अकील जाधव व धनश्री अश्या मित्रपरिवाचे सहकार्य लाभले. सध्या देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
                  
स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण असा संदेश साहिलने या देखाव्यातून दिला आहे. संगमेश्वर तालुक्यातील कर्णेश्वर सप्तेश्वर मारलेश्वर व इतर पर्यटन स्थळांची माहिती या या देखाव्यातून त्यांनी दिली आहे. संगमेश्वर मधील पर्यटनाचा विकास झाला तर रोजगार निर्मिती होईल व संगमेश्वर चे नाव जागतिक पटलावर पोहोचेल असा विश्वास द्यावे यावेळी व्यक्त केला. पंचक्रोशीतून सदर देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली असून येत आहे सर्व नागरिक साहिल चे कौतुक करण्यात येत आहे.

दरवेळेला नवीन संकल्पना घेऊन एक वेगळा संकल्पना साहिल याने टिकवून ठेवली आहे. कोकण रेल्वे संगमेश्वर रेल्वे स्टेशन ,उक्षी येथील रेल्वेमधून दिसणारा धबधबा अनेक पर्यटनात्मक स्थळाचा सुंदर मांडणी साहिल यांनी केले आहे. दरवर्षाची परंपरा साहिल यांनी चालू ठेवली आहे. त्यामुळे साई याचे मित्रपरिवार ज्ञानेश्वर पंचक्रोशी मध्ये कौतुक होत आहे

🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page