
गुहागर प्रतिनिधी- गुहागर येथे शिक्षक म्हणून कार्यरत ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण आपल्या पत्नी व दोन मुलांसह गणपतीसाठी मंगळवारी हिंगोलीकडे निघाले. सायंकाळी सुमारे पाच वाजता चिपळूण परिसरात त्यांचा शेवटचा संपर्क झाला. त्यानंतर दोन्ही मोबाईल बंद असल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
चव्हाण कुटुंब गणेशोत्सवासाठी मूळ गावी जात होते. अद्याप त्यांचा कोणताही संपर्क मिळालेला नाही. कुटुंबीय हिंगोलीहून पोहोचून मित्र व नातेवाईकांकडे चौकशी करत आहेत. कुटुंब ज्या गाडीने प्रवास करत होते किंवा त्यांना कुणी पाहिले असल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. मदतीसाठी भारत देवकांत पाटण (९८५०२७७९४२) आणि अभिजित गोळे सर (८९७५७३२०९४) यांच्याशी संपर्क साधता येईल.

या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिक आणि स्थानिक प्रशासन कुटुंब सुरक्षित राहावे यासाठी प्रयत्न करत आहेत. माहिती असलेल्यांनी तातडीने पोलिस किंवा वरील संपर्कांकडे माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.