
मुंबई :- मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग रो-रो फेरी सेवा लवकरच सुरु होणार असल्याची घोषणा केली. ही सेवा १ किंवा २ सप्टेंबरपासून सुरु करण्याचा सरकारचा मानस असून हवामान सुधारताच ही सेवा कार्यान्वित होणार आहे.
नितेश राणे पत्रकार परिषदेत म्हणाले की, ‘रो-रो सेवा’ या सेवेचा उद्देश मुंबई ते कोकण प्रवास जलद, सुरक्षित आणि आरामदायी करणे आहे.
‘M2M’ नावाची बोट ही सेवा मुंबईतील भाऊच्या धक्क्यावरून सुरु होईल. या बोटीसाठी १४७ विविध परवानग्या मिळाल्या आहेत, अशी माहिती राणे यांनी दिली.
पहिला थांबा: जयगड
दुसरा थांबा: विजयदुर्ग
याठिकाणी लवकरच ट्रायल फेऱ्या देखील घेण्यात येणार आहेत.
दक्षिण आशियातील सर्वात वेगवान फेरी सेवा
ही बोट २५ नॉट्स इतक्या वेगाने धावणार असून, ती दक्षिण आशियातील सर्वात वेगवान प्रवासी बोट असणार आहे.
मुंबई ते रत्नागिरी प्रवास : ३ ते ३.५ तास
मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास : ५ तास
यामध्ये वेगवेगळ्या श्रेणीचे प्रवासी वर्ग असतील – एकोनोमीपासून फर्स्ट क्लासपर्यंत.
प्रवाशांसाठी दर निश्चित – वाहनांनाही परवानगी
दर खालीलप्रमाणे असतील:
श्रेणी दर (₹)
इकोनॉमी ₹२,५००
प्रीमियम इकोनॉमी ₹४,०००
बिझनेस क्लास ₹७,५००
फर्स्ट क्लास ₹९,०००
चारचाकी वाहन ₹६,०००
मिनी बस ₹१३,०००
एकावेळी ५० चारचाकी गाड्या या बोटीत नेता येणार असून, वाहनांसाठी खास डेकची व्यवस्था करण्यात आली आहे.
सध्या हवामान ढगाळ असल्यामुळे काही दिवस सेवेला विलंब होणार आहे. “हवामान खात्याचा अलर्ट पाहता १ किंवा २ सप्टेंबरनंतर सेवा सुरु करू. कोणतीही रिस्क घेणार नाही,” असं राणे यांनी स्पष्ट केलं. मात्र ही सेवा कायमस्वरूपी चालू राहणार असून, कोकणातील प्रवाशांसाठी ती मोठा दिलासा ठरणार आहे.
कोकणवासीयांसाठी प्रवासाचा नवा अध्याय
या सेवेच्या माध्यमातून कोकणात येणाऱ्या पर्यटकांना आणि स्थानिक प्रवाशांना वेळेची मोठी बचत होणार आहे. रस्त्याचा त्रास आणि ट्रॅफिकपासून दूर जाऊन, समुद्रमार्गे कोकणात जलद आणि आरामदायी प्रवास करणं शक्य होणार आहे.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर
