
*संगमेश्वर :- दिनेश अंब्रे-* गौरी गणपतीचा सण तोंडावर आला असताना गणपती चित्र शाळेत कामाची लगबग दिसून येत आहे. नावडी येथील मूर्तिकार श्री.अवधूत उमेश खातू यांनी गेली 23 वर्ष शाडू माती पासून ग्राहकांच्या पसंतीप्रमाणे वेगवेगळ्या गणेश मूर्ती घडविल्या आहेत. या कलेचे संवर्धन करताना त्यांनी आपले कॉलेज मधील कला शिक्षक व गुरु श्री.जे.डी. पराडकर सर यांच्या उत्तम मार्गदर्शनामुळे या कलेची सुरुवात करून परंपरा जोपासली आहे.



सुरवातीला 15 गणेश मूर्ती तयार करून चित्र शाळेचा आरंभ केला होता. सध्या हस्त कौशल्यातून 80 ते 85 मूर्ती चित्र शाळेत घडवल्या आहेत. त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. ऐश्वर्या खातू यांची या कामात उत्तम साथ आतापर्यंत लाभली आहे. सध्या कारखान्यात गणेश मूर्तीवर रंगकामाचा शेवटचा हात फिरवला जात आहे. चित्र शाळेत सर्वात मोठी राजस मूर्ती साडेतीन फुटाची आहे बाजारपेठेतील सुप्रसिद्ध व्यापारी श्री. अनिल गजानन शेट्ये यांच्या घरी ती विराजमान केली जाणार आहे. या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे विविध वस्त्र अलंकाराने सजवलेल्या मूर्ती पाहणाऱ्यांची मने आकर्षित करतात.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर