चौथा श्रावणी सोमवार: शिवलिंगावर वाहा ‘ही’ शिवामूठ; काय आहे आजचा शुभ मुहूर्त, वाचा पंचांग…

Spread the love

18 ऑगस्ट रोजी चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवार आहे. शिवलिंगावर ‘जवस’ची शिवामूठ अर्पण करा. काय आहे आजचा शुभ मुहूर्त जाणून घ्या सविस्तर ‘ईटीव्ही भारत’च्या पंचांगातून…


मुंबई : देवशयनी एकादशीला श्रीविष्णू योगनिद्रेत गेल्यानंतर सृष्टीचा सगळा कारभार, शिवशंकरावर असतो, असं मानलं जातं. त्यामुळं या काळात महादेवांची उपासना, नामस्मरण करण्यावर भर दिला जातो. श्रावण हा महादेवाची पूजा, नामस्मरण, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेला आहे. श्रावणातील (Shravan 2025) प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त आहे.

आजची तारीख : 18-08-2025

वार : सोमवार
आजची तिथी : कृष्ण दशमी
आजचे नक्षत्र : मृगशीर्ष
अमृतकाळ : 14:15 to 15:51
राहूकाळ : 07:53 to 09:28
सुर्योदय : 06:17:00 सकाळी
सुर्यास्त : 07:02:00 सायंकाळी

चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवार : 18 ऑगस्ट 2025 रोजी चौथ्या श्रावणी सोमवारी महादेवाला ‘जवस’ची’ शिवामूठ वाहावी.

शिवामूठ करण्याची पद्धत (Shivamuth): विवाहानंतर पहिली पाच वर्षे श्रावण सोमवारी शिवामूठ व्रत केलं जातं. श्रावण मासात येणार्‍या चार सोमवारी चार प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जाते. विवाहानंतरची पहिली पाच वर्षे क्रमवार हे व्रत केले जाते. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवलिंगाची पूजा करावी आणि क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस आणि सातू (पाचवा सोमवार आल्यास त्या दिवशी) या धान्याच्या पाच मुठी देवावर वाहाव्या.

‘या’ पद्धतीनं करा महादेवाची पूजा : सोमवारी सकाळी स्नान करून उपवास करून महादेवाची पूजा करावी. सकाळच्या शुभ मुहूर्तावर शिव मंदिरात किंवा घरातील शिवलिंगाची पूजा करावी. महादेवाला गंगाजल किंवा दुधानं अभिषेक करावा. यानंतर महादेवाला चंदन, बेलपत्र, अक्षता, पांढरी फुलं, मध, फळं, साखर, अगरबत्ती अर्पण करावी आणि सोमवारची कथा वाचावी. शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावून आरती करावी. तर प्रत्येक सोमवारी भगवान महादेवाला शिवामूठ नक्की अर्पण करा.

🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page