
संगमेश्वर: अर्चिता कोकाटे/ नावडी- तालुक्यातील कोळंबे येथील कोळंबे विद्या प्रसारक मंडळ कोळंबे संचलित श्रीमती कमळजाबाई पांडुरंग मुळे प्रशालेत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व रक्षाबंधन हा कार्यक्रम उत्साह संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर मान्यवर म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. रविंद्र मुळे प्रमुख अतिथी दिनेश अंब्रे ( सामाजिक कार्यकर्ते नावडी) पर्यवेक्षक शिवराम जोशी शिक्षक कांबळे व शिक्षक करडे, श्रीमती मुळे आदी उपस्थित होते.
सुरुवातीला विद्यार्थ्यांनी ईशस्तवन, स्वागत पद्य व राज्य गीत आदि तबला व हार्मोनियमच्या सुरावर सादर केले. प्रशालेचे शिक्षक शिंदे सर, राहटे सर व फराकटे मॅडम यांनी मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. शिक्षक शिवराम जोशी यांनी यावेळी कार्यक्रमाचा हेतू तसेच मान्यवर व देणगीदार यांचा परिचय करून दिला.

प्रशालेच्या वतीने कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दिनेश हरिभाऊ अंब्रे यांचा मुख्याध्यापक रवींद्र मुळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रशालेतील नववीतील विद्यार्थिनी कुमारी श्रुती मोहिते व पाचवीतील विद्यार्थिनी कुमारी आरोही पंडित या दोन विद्यार्थिनींना वर्षभराचे साहित्य, शालेय साहित्याचे वाटप मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी दिनेश अंब्रे यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात संस्कृती, संस्कार व नैतिक मूल्य या गुणांची जीवनात जपणूक केली पाहिजे तसेच वाईट व्यसनापासून दूर राहणे व त्याचे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम आदी बाबींवर बहुमोल मार्गदर्शन केले तसेच नेहमीच गुरुजनांचा आदर करावा असे प्रति पाहिले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रशालेचे मुख्याध्यापक रवींद्र मुळे यांनी उपक्रमशील व्यक्तिमत्व व कायदासाथी दिनेश अंब्रे यांच्या प्रशालेसाठी गेले 14 वर्ष दिलेल्याअमूल्य योगदानाबद्दल प्रशंसा असा व्यक्त केली व देणगीदारांचे आभार मानले. यावेळी नेतृत्व गुण असलेली प्रशालेतील इयत्ता अकरावीतील विद्यार्थिनी कुमारी स्वीटी संजय चंद्रकर हिचा मान्यवर दिनेश अंब्रे यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
प्रशालेतील विद्यार्थिनींनी रक्षाबंधन सण साजरा करत असताना प्रारंभी मान्यवर दिनेश अंब्रे व मुख्याध्यापक रवींद्र मुळे व शिक्षक वृंदा ना राखी बांधून औक्षण केले व सणाचे औचित्य साधले. शेवटी प्रशालेच्या वतीने आभार प्रदर्शन श्री.करडे सर यांनी केले.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*