
मुंबई प्रतिनिधी- अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत शासनाच्या सेंट्रलाइज ऑनलाइन प्रणालीने विद्यार्थ्यांचा व पालकांचा जीव टांगणीला लावला आहे. गुण असूनही नावे यादीत न आल्याने शैक्षणिक वर्ष धोक्यात जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
पहिल्या चार कॅप राऊंडमध्येच जास्त गुणधारक अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. यामागे ऑनलाइन फॉर्म अनलॉक व लॉक करण्याविषयीची अज्ञानता, वारंवार बदलणारे नियम आणि वेळेत सुधारणा न होणे, हे मोठे कारण असल्याचे समोर आले आहे. परिणामी, त्यांची नावे “ओपन टू ऑल” याद्यांमध्ये समाविष्टच झाली नाहीत.

सध्या सुरू असलेल्या ओपन टू ऑल फेरीत देखील, मेरीट खाली येऊनही अनेक विद्यार्थ्यांची नावे गायबच आहेत. “कोणाला भेटावे, काय करावे?” या संभ्रमात विद्यार्थी व पालक मानसिक तणावाखाली आहेत.
काही महाविद्यालयांकडून “जागा शिल्लक राहिल्या तरच प्रवेश मिळेल” असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. दरम्यान, 11 ऑगस्टपासून महाविद्यालये सुरू होत असल्याने इच्छित शाखा व आवडीचे महाविद्यालय मिळेल की नाही याबाबत गंभीर शंका व्यक्त होत आहे.
या परिस्थितीमुळे “शैक्षणिक वर्ष वाया जाईल का?” अशी भीती निर्माण झाली असून, प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ तातडीने दूर करून स्पष्ट मार्गदर्शन करावे, अशी पालक व विद्यार्थ्यांची मागणी आहे.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर



