
अर्चिता कोकाटे/ नावडी- संगमेश्वर येथील नावडी भंडारवाडा येथे राहणारे सुप्रसिद्ध गणेश मूर्तिकार प्रशांत उर्फ सन्ना सुर्वे यांच्या चित्र शाळेत सध्या गणेश मूर्ती कामाची लगबग सुरू आहे. सन्ना सुर्वे यांचे गणपती कलेचे शिक्षण 15 वर्ष श्री. नंदकुमार भाटकर (भाटे) रत्नागिरी यांच्याकडे झाले. त्यानंतर 2007 साली त्यांनी संगमेश्वर भंडार वाडा येथे आपल्या राहत्या घरी गणेश चित्र शाळेला आरंभ केला. आई कै. सौ. जयमाला जगन्नाथ सुर्वे व वडील कै. श्री. जगन्नाथ मुकुंद सुर्वे यांच्या त्यावेळच्या पाठबळामुळे जीवनात पुढे जाण्याचा मार्ग मिळाला.
सुरुवातीला दोन गणपती चित्रे काढून शाडू माती व रंग कलेला सुरवात केली. मेहनत, जिद्द, आवड व चिकाटी या गुणांच्या जोरावर व उत्तर सहचारिणी पत्नी सौ. प्राप्ती यांच्या सहकार्यामुळे पुढे चित्र शाळेत गणपतीच्या ऑर्डर येऊ लागल्या. ग्राहकांच्या आवडीप्रमाणे सांगतील त्या कॅलेंडर,चित्र याप्रमाणे सन्ना सुर्वे ग्राहकांना रेखीव मूर्ती देऊ लागले.





सध्या कारखान्यात कलाधिपती, कैलास पती, राजेशाही,लालबागचा राजा, स्वामी समर्थ, शिवपिंडीवर बेल वाहणारा,हत्तीच्या सोंडेला मिठी मारलेल्या इत्यादी प्रकारच्या आगळ्यावेगळ्या मूर्ती आकर्षक व देखण्या मूर्ती साकारलेल्या आहेत. दोन ते चार फूट उंची पर्यंतच्या मूर्ती शाडू माती पासून हस्त कौशल्यातून घडवलेल्या दिसत आहेत. चित्र शाळेला सतरा वर्ष पूर्ण झाली असून यंदा गणपतीचा सण लवकर असल्यामुळे सन्ना सुर्वे यांच्या चित्र शाळेत माती कामाची लगबग आहे.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर