
संगमेश्वर : अर्चिता कोकाटे/ नावडी- लोवले येथे राहणारे व नावडी येथे पोस्ट गल्ली रोड येथे गेली अनेक वर्ष वाद्य साहित्य दुकान थाटून असलेले चर्म वाद्य कर्मी कलाकार दिलीप लिंगायत सन 1876 सालाच्या आधीपासून कै. श्री.गणलिंग लिंगायत कसबा यांनी या व्यवसायास त्याकाळी सुरुवात केली. त्यानंतर त्यांचे वंशज कै.श्री. भाऊ लिंग गणलिंग लिंगायत यांनी सन 1955 सालापर्यंत देवीचे मृदुंग भरणे हे काम करीत असत.
सन १९६० च्या काळात कै. श्री. सदाशिव भाऊलिंग लिंगायत यांनी नावडी येथील बाजारपेठेत आपले दुकान थाटले.
काही वर्ष त्यांचे दुकान गणपती मंदिर गणेश आळी येथे होते.मुचरी, फुणगुस, खाडीपट्टा नायरी इतक्या लांबून लोक ढोलकी, नाल, तबला, डगा भरण्यासाठी येत असतात.
गेली अनेक वर्ष त्यांनी हा व्यवसाय सांभाळला.सध्या हा व्यवसाय कै.श्री.सदाशिव लिंगायत यांची मुले श्री. दिलीप व प्रकाश लिंगायत हे सांभाळतात.

या व्यवसायात मुले शिवम व अजिंक्य सध्याच्या काळात मदत करतात. नावडी मधील पोस्ट आळी येथील प्रकाश सदाशिव लिंगायत यांच्या दुकानात नाला, पखवाज , तबला, ढोलकी, डगा, मृदुंग, ढोलक, ताशा, डफली इ. चर्म वाद्य भरून घेण्यासाठी तालुक्यातील विविध गावातून सध्या गोकुळाष्टमी, अखंड हरिनाम सप्ताह तसेच गौरी गणपती सण व उत्सव हे जुलै ऑगस्ट सप्टेंबर या कालावधीत असल्यामुळे ग्राहकांची दिलीप लिंगायत यांच्या दुकानात या कामासाठी गर्दी झालेली दिसून येते.एकूणच १५० वर्षांनी कलेची परंपरा दिलीप लिंगायत यांनी जपली आहे.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*