मोठी बातमी! माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन; दिल्लीत घेतला अखेरचा श्वास….

Spread the love

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली, ते 79 वर्षांचे होते.माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन; दिल्लीत घेतला अखेरचा श्वास…

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal malik) यांचे निधन झाल आहे. दिल्लीतील (Delhi) आरएम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली, ते 79 वर्षांचे होते. गोवा, मेघालय, ओडिशा आणि जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून त्यांनी आपली कार्यभार सांभाळला. तत्पूर्वी आमदार ते राज्यपाल असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त होत आहे. तसेच, दिग्गजांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.


सत्यपाल मलिक यांचा प्रवास सपामधून सुरु झाला होता, ते काही काळ भाजपमध्येही कार्यरत होते. मात्र, अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका केल्याने त्यांच्याकडे देशभरातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागले होते. जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर मोठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी सत्यपाल मलिक जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते. अशा महत्त्वाच्या क्षणी प्रशासन आणि कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी राज्यपाल म्हणून सत्यपाल मलिक यांच्याकडे होती. सत्यपाल मलिक यांच्याच कार्यकाळात जम्मू काश्मीर आणि लडाख असे भाग करण्यात आले होते. दरम्यान, सत्यपाल मलिक यांना 3 नोव्हेंबर 2019 ला गोव्याच्या राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, पुलवामामध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर मलिक यांनी केंद्रातील मोदी सरकावर गंभीर आरोप केले होते, जवानांना हेलिकॉप्टर देण्याऐवजी बसने पाठविण्यात आल्याचे सांगत त्यांनी सरकारला लक्ष्य केलं होतं. त्यांच्या या आरोपानंतर ते दशभरात चर्चेत आले होते.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून सत्यपाल मलिक यांना मुत्रपिंडाचा त्रास होते, त्याच अनुषंगाने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला

ऑपरेशन सिंदूरवर मलिक यांच्याकडून समाधान….

पुलवामा हल्ल्यावरुन केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप करणाऱ्या जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ऑपरेशन सिंदूरवर समाधान व्यक्त केलं होतं.  मलिक यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट लिहिले होते की, भारतीय सैन्य दलाचा अभिमान आहे. पक्षीय राजकारणापासून दूर होत भारतातील विविध पक्षाच्या नेत्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या हद्दीतील दहशवादी ठिकाणांवर हल्ले केले. त्याबद्दल भारत माता की जय आणि जय हिंद… असे ट्विट मलिक यांनी केले होते.

🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page