
संगमेश्वर – मुंबई -गोवा महामार्गावरील धामणी येथे चंद्रकांत गणू बांबाडे यांच्या मालकीच्या काजू सोलण्याच्या कारखान्याला आग लागल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.
अचानक कारखान्याच्या इमारतीतून धुराचे लोळ बाहेर पडू लागले व काही वेळातच आगीच्या ज्वाला भडकू लागल्या. ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र काजू बिया असल्याने आग विझवण्याच्या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर देवरुख नगर पंचायत कडून आलेल्या अग्निशमन बंबाने आग आटोक्यात आणली.
देवरुख नगरपंचायतीच्या अग्निशमन दल तत्काळ दाखल..
गोवा राष्ट्रीय महामार्गवरील धामणी येथे चंद्रकांत गणू भांबाडे यांच्या काजू फॅक्ट्री असलेल्या इमारतीला आग लागली असून. देवरुख नगर पंचायत चा अग्निशमन दाखल झाला. शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहे.आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. चंद्रकांत भांबाडे यांच्या काजू फॅक्टरी असलेल्या इमारतीत काजू सोलण्याचे किमती असलेले मशीनरी तसेच काजू बिया व अन्य सामान आगीत जळून खाक झाले आहेत. अग्निशमन बंब दाखल होण्या पूर्वी स्थानिक ग्रामस्थांनी सुद्धा आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले होते. ग्राम महसूल अधिकारी विलास गोलप, संदेश घाग, पोलीस पाटील अनंत (अप्पा )पाध्ये सुद्धा आगीच्या घटनास्थळी दाखल झाले होते.
कारखान्यातील मशीनसहित काजू बिया इत्यादी किमती यंत्रसामुग्री आगीने स्वतःच्या ज्वाळात लपेटून घेत भक्ष्य केल्याने चंद्रकांत बांबाडे यांचे सुमारे 73 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. चंद्रकांत बांबाडे यांचे धामणी येथे महामार्गालगत एका इमारतीत काजू बिया सोलण्याचा कारखाना आहे. काजू बिया सोळण्यासाठी लागणारी किमती यंत्रसामुग्री तसेच काजू बिया होत्या. सकाळी बंद असलेल्या इमारतीतून धुराचे लोळ दिसू लागले व नंतर भडकलेल्या आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या व काही वेळात आगीने रौद्र रूप धारण केले.
स्थानिक ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले मात्र आग आटोक्यात येत येत नसल्याचे पाहून देवरुख नगर पंचायतच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.अवघ्या काही वेळातच अग्निशमन आगीच्या घटनास्थळी पोहचला अग्निशमन जवानांनी ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु केले. इमारतीतील यंत्रसामुग्रीला वेढा घातलेल्या आगीवर जोरदार पाण्याचा मारा सुरु केल्या नंतर आगीने अखेर हार पत्करली. मात्र तो पर्यंत खूप उशीर झाल्याने आगीने भक्ष्य केलेली यंत्रसामुग्री व काजू बीयांची जळून राख रांगोळी झाली.
काजू कारखान्याचे 72 लाख 51267 रुपयांचे नुकसान….
आग लागल्याचे कारण स्पष्ट झाले नसून, या आगीत स्टीम कुकर, काजू ड्रायर मशीन, ऑटोमॅटिक काजू कटर मशीन, पोलिंग मशीन, कोम्प्रेसर हॅन्ड कटर,ग्रॅण्डिंग मशीन, मॉश्वर ड्रायर तसेच तीन टन मिक्स काजू गर व सुमारे सात टन रॉ मटेरियल तसेच इमारतीचे नुकसान झाल्याची ग्राम महसूल अधिकारी व्हि. व्हि. घोलप यांनी एकूण 72 लाख 51267 रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचयादीत नमूद केले आहे. सदरील पंचनामा देवरुख तहसीलदार यांना सादर करणार असल्याचे ग्राम महसूल अधिकारी घोलप यांनी सांगितले.