
रत्नागिरी :- शहराच्या मध्यवर्ती भागातील जयस्तंभ ते स्टेट बँक मार्गावर असणाऱ्या एका संकुलातील दोन फ्लॅट चोरट्यांनी फोडले. गुरुवारी दुपारी ही घटना उघडकीला आली.
रत्नागिरी शहरातील जयस्तंभ परिसरात चोरट्यांनी दोन फ्लॅट फोडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या चोरीची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे अद्याप किती रुपयांचा ऐवज चाेरीला गेला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही.