नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला हादरा….
नवी मुंबई : दिनांक ११ मार्च रोजी मनसे उपशहर अध्यक्ष प्रसाद घोरपडे ह्यांनी आपल्या कोपरखैरणे येथील ऑफिसमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्रकारांना सांगितले. मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे ह्यांच्या पक्षांतर्गत कुरघोडीला कंटाळून राजीनामा देत असल्याचे यावेळी प्रसाद घोरपडे ह्यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये प्रसाद घोरपडे ह्यांनी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे ह्यांच्यावर गंभीर आरोप करत कशा प्रकारे गजानन काळे आपल्याला त्रास देत आहेत ह्याची भली मोठी यादीच बोलून दाखवली. आर्थिक घोटाळा, धमकी देणे, वरिष्ठांकडून पाठबळ न मिळणे, पक्षांतर्गत कामे करताना ढवळाढवळ करणे अशा अनेक कारणांमुळे पदाचा राजीनामा देत असल्याचे प्रसाद घोरपडे ह्यांनी सांगितले.