सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड-नांदगाव महामार्गावर जामसंडे खाकशी तिठानजिक धोकादायक वळणावर रिक्षा व स्विफ्ट कार यांच्यात झालेल्या अपघातात रिक्षाचालक अभिजित कृष्णा पुजारे (३५) हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी पडवे येथे नेत असताना उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी दुपारी ११.३० वा. सुमारास झाला. या अपघातावेळी रिक्षामध्ये असलेली ९ महिन्यांच्या मुलीसह तिची आई सुदैवाने बचावली. स्विफ्टचालक हे देवगड पोलीस ठाण्याचे अधिकारी असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघाताची नोंद देवगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
रिक्षाचालक अभिजित पुजारे हा नाडण येथून शनिवारी सकाळी ९ वा. रचना राजेंद्र धुरी (४०) व तिची लहान मुलगी यांना तळवडे येथे रिक्षाने घेवून जात होता. देवगड -नांदगांव मार्गावर खाकशी तिठानजिक धोकादाययक वळणावर आल्यानंतर समोरून येणार्या स्विफ्ट कारला रिक्षेची धडक बसून अपघात झाला. या भीषण अपघातात रिक्षाचालक अभिषेक याच्या दोन्ही पायांना व डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर रिक्षेत असलेल्या रचना धुरी व त्याच्या छोट्या मुलीला किरकोळ दुखापत झाली. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. अपघात झाल्यानंतर रिक्षातून महिलेच्या हातात असलेली छोटी मुलगी रस्त्यावर फेकली गेली. मात्र सुदैवाने काहीही दुखापत झाली नाही. मात्र रिक्षाचालक अभिजित पुजारेचे दोन्ही पाय व डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने देवगड ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. ग्रामीण रूग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून तात्काळ पडवे येथे नेण्यात आले परंतु त्याचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला
जाहिरात :