
चिपळूण :- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात मोठ्या प्रमाणात मातीच्या भरावाची घसरण सुरूच आहे. या मार्गावरील प्रवास अत्यंत धोकादायक बनला आहे. घाटातील संरक्षक भिंतीच्या आतील आणि बाहेरील दोन्ही भागांतील भराव हळूहळू घसरत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे परशुराम घाटात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सोमवारी सकाळी घाटात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर
