मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, सोमवारपासून या मार्गावर धावणार बेस्टची दुसरी ई-डबल डेकर बस

Spread the love

मुंबई : बेस्टने शुक्रवारी मुंबईकरांसाठी महत्त्वाची माहिती दिली आहे. बेस्ट सोमवारपासून अर्थात १२ मार्चपासून सीएसएमटी स्टेशन ते कफ परेड (बॅकबे डेपो) मार्ग १३८ वर दुसरी इलेक्ट्रिक डबल डेकर बस चालवणार आहे. फेब्रुवारीमध्ये सुरू झालेली पहिली बस सीएसएमटी-एनसीपीए (नरीमन पॉइंट) मार्गावर धावते. ही बस गर्दीच्या वेळी पूर्णपणे भरलेली असते.

१३८ हा कफ परेडचा अतिशय लोकप्रिय मार्ग आहे. या मार्गावर मोठी गर्दी असते. त्यामुळेच आम्ही या मार्गावर दुसरी ई-डबल डेकर बस चालवण्याचा निर्णय घेतला असल्याचं बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितलं. तसंच काही जुन्या डबल डेकर बसेस नवीन मार्गांवर ट्रायलवर चालवल्या जात आहेत. सध्या बेस्टच्या ताफ्यात ४५ जुन्या डिझेलवर चालणाऱ्या डबल डेकर बस आहेत.

ज्याठिकाणी बसेस नवीन मार्गांवर ट्रायलवर चालवल्या जात आहेत, त्यामध्ये दादर पूर्व स्थानक ते परळमधील महर्षी दयानंद महाविद्यालयाकडे जाणारा एक मार्ग आहे. त्याशिवाय सीएसएमटी ते गेटवे ऑफ इंडियाचा दुसरा मार्ग समाविष्ट आहे. या मार्गांवर सध्या मिडी एसी इलेक्ट्रिक बसेसद्वारे सेवा दिली जात आहे. या डबल डेकरची क्षमता तीन फेऱ्यांची आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, आमचे उद्दिष्ट जुन्या डबल डेकरची जागा घेण्याचा आहे, ज्याची सध्या ट्रायल सुरू आहे. नवीन इलेक्ट्रिक एसी ट्विन डेक बसेस दर महिन्याला ताफ्यात येत आहेत. बेस्टच्या ताफ्यात दर महिन्याला अशा २० ते २५ नवीन बसेसचा ताफ्यात समावेश करण्याची अपेक्षा आहे.

२०० बसेसचा पुरवठा करणाऱ्या आणि ई-बसेस चालवण्याचा करार केलेल्या स्विच मोबिलिटी या कंपनीने या वर्षाच्या अखेरीस सर्व बसेस मुंबईच्या रस्त्यांवर धावतील अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page