
रत्नागिरी :- शहरातील परटवणे तिठा येथे बंद
टपरीच्या आडोशाला मटका जुगार चालवणाऱ्या संशयितावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जुलै रोजी सायंकाळी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. संतोष यशवंत मयेकर (५१, रा. काळबादेवी, मयेकरवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ३ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. परटवणे येथे मटका जुगार चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयित हा विनापरवाना मटक-जुगार चालवत असल्याचे आढळले.