
वार्ताहर/ पाली- पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार तालुक्यातील पाली विभागातील साठरे बांबर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवसेनेचे ग्रा.प.सदस्य रुपेश खोचाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी शिवसेना हातखंबा पाली जि.प.गट विभागप्रमुख सचिन सावंत,विभागसंघटक दत्ताराम शिवगण, उपविभागप्रमुख गौरव संसारे,साठरे सरपंच तृप्ती पेडणेकर,ग्रा.पं.अधिकारी श्रावणी कोकरे,माजी उपसरपंच प्रमोद ठीक,ग्रा.पं.सदस्य जयनंद सावंत,सिद्धी रसाळ, निकिता तेरेकर,प्रिती पवार,गायत्री चव्हाण,माजी सरपंच प्रभाकर खोचाडे, संजय तेरेकर,श्रीराम रसाळ,पोलीस पाटील संजू सावंत, गुरुदास सुर्वे,नरेश रसाळ व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपसरपंच रुपेश खोचाडे म्हणाले की, मला मिळालेल्या या पदाचा वापर मी सर्वांना सोबत घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण गावाच्या विकासासाठी करून गावाला आदर्शवत करेन व माझ्यावर पक्ष्याने टाकलेला विश्वास निश्चितच सार्थकी ठरवेन यात शंका नाही असे सांगितले.