
राजापूर प्रतिनिधी- महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षांतर्गत मोठे फेरबदल झाले होते . तसंच फेरबदल रत्नागिरी चे पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना शिवसेनेकडून उमेदवारी भेटल्यानंतर झाला होता . त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित यशवंतराव यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता . अजित यशवंतराव यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांची भेट घेतली.विधानसभा निवडणुकीच्या काळात राजन साळवी यांना पाठिंबा देण्यासाठी अजित यशवंतराव यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
विधानसभा निवडणुकीत राजन साळवी यांना अपयश आल्यानंतर राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश केला. या काळात अजित यशवंतराव हे शांत होते. ॲक्टिव्ह नव्हते. त्यानंतर त्यांनी आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करून ते आता पुन्हा सत्तेत सामील झाले आहेत.
मात्र अजित यशवंतराव यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे महायुती मधील काही नेत्यांना रूचलेले दिसत नाहीये. त्यामुळे महायुती मधील काही नेते, ज्यांनी चिपळूण येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत यादव यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्यांच्याशीच आता जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहेत
या राजकीय पद्धतीमुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. मात्र असे असले तरी येणाऱ्या काळात अजित यशवंतराव यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मोठी संधी मिळू शकते असेही आता बोलले जात आहे.