‘या’ राशींना मिळेल कामात यश आणि नशिबाची साथ; वाचा राशीभविष्य…

Spread the love

आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य (Horoscope) कसं असेल, जाणून घ्या आचार्य सरिता शर्मा यांच्या आजच्या राशीभविष्यात.

मेष (ARIES) : कन्या राशीचा चंद्र आज आपल्या सहाव्या भावात असेल. आजचा दिवस दूरगामी आर्थिक योजनेसाठी अनुकूल असून आर्थिक आणि व्यावसायिकदृष्टया फायदेशीर आहे. आज शारीरिक आणि मानसिक उत्साह अनुभवाल. मित्राकडून भेटवस्तू मिळतील. त्यांच्यासह आनंदात वेळ जाईल. तसेच त्यांच्यासह एखाद्या समारंभास किंवा सहलीस जाऊ शकाल. सद्भावनेने केलेले परोपकारी काम मनाला आत्मिक आनंद देईल.

वृषभ (TAURUS) : कन्या राशीचा चंद्र आज आपल्या पाचव्या भवात असेल. आज आपल्या बोलण्याच्या जादूने कोणी प्रभावीत होऊन आपला फायदा होईल. तसेच मधुर आणि सौम्य भाषणाने नवे संबंध प्रस्थापित व्हायला मदत होईल. मंगल कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. वाचन – लेखन या सारख्या साहित्य प्रकारात अभिरुची वाढेल. कष्टाच्या मानाने यश कमी मिळत असले तरीही आपली कामातील तत्परता आणि कुशलता प्रगतीस सहाय्यक होईल. विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती करू शकतील. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभू शकेल. पोटाच्या तक्रारीने त्रस्त व्हाल.

मिथुन (GEMINI) : कन्या राशीचा चंद्र आज आपल्या चौथ्या भावात असेल. द्विधा अवस्थेतील आपले मन महत्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही. वैचारिक वादळामुळं मानसिक अस्वस्थता अनुभवाल. अधिकतम हळवेपणा आपल्या दृढतेला कमकुवत करेल. पाणी तसेच इतर प्रवाही पदार्थांपासून सावध राहा. कुटुंब किंवा जमीन या संबंधी विषयावर चर्चा किंवा प्रवास टाळा. शारीरिक आणि मानसिक स्वस्थतेचा अभाव राहील.

कर्क (CANCER) : कन्या राशीचा चंद्र आज आपल्या तिसऱ्या भावात असेल. आज भावंडांकडून लाभ होतील. मित्राचा सहवासाचा आनंद लाभेल. रम्यस्थळी सहलीस जाण्याची शक्यता आहे. प्रत्येक कामात यश मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. भावनेला प्राधान्य दिल्याने संबंध सुखद होतील. नशिबाची साथ मिळेल. सामाजिक आणि आर्थिक सन्मान होतील.

सिंह (LEO) : कन्या राशीचा चंद्र आज आपल्या दुसऱ्या भावात असेल. आजचा दिवस कुटुंबियासह सुखात घालवाल. त्यांचे सहकार्य मिळेल. स्त्री मित्रांकडून विशेष मदत प्राप्त होईल. दूरचे मित्र आणि स्नेही ह्यांच्याशी साधलेला संपर्क फायदेशीर ठरेल. आपल्या प्रभावी संभाषणाने लोकांचे लक्ष वेधून घ्याल. प्राप्ती पेक्षा खर्च जास्त होईल. उत्कृष्ट भोजन मिळेल. नियोजित कामात यश कमीच मिळेल.

कन्या (VIRGO) : कन्या राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम भावात असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. वैचारिक समृद्धी वाढेल. मधुरवाणी यांच्या साह्याने मैत्रीपूर्ण संबंध विकसीत करू शकाल. उत्तम भोजन, भेटवस्तू, वस्त्र इत्यादींची प्राप्ती होईल. शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. आनंदाची प्राप्ती, जीवन साथीचा सहवास आणि सहल प्रवास यामुळं आपला दिवस आनंदात जाईल.

तूळ (LIBRA) : कन्या राशीचा चंद्र आज आपल्या बाराव्या भावात असेल. आज थोडा सुद्धा असंयम आणि अवैध व्यवहार आपणास अडचणीत टाकेल. एखादी दुर्घटना संभवते. बोलण्यातील शिथीलता उग्र तक्रार वाढवण्याची शक्यता आहे. सगे सोयरे ह्यांच्याशी पटणार नाही. मनोरंजन तसेच फिरण्यात पैसे खर्च होतील. भिन्नलिंगी आकर्षणात वाढ होईल. शारीरिक व मानसिक व्यग्रता कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

वृश्चिक (SCORPIO) : कन्या राशीचा चंद्र आज आपल्या लाभात असेल. आज नोकरी – व्यवसायात लाभप्राप्ती होईल. मित्रांसह गाठीभेटी, प्रवास ठरवाल. विवाहोत्सुक तरूण तरूणींसाठी चांगली संधी आहे. संतती किंवा पत्नीकडून लाभ होईल. वाडवडील किंवा थोरले बंधू त्या लाभात निमित्तमात्र बनतील. स्नेही मित्र यांच्याकडून भेटवस्तू मिळतील. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. . वैवाहिक जीवनात मनसोक्त आनंद उपभोगू शकाल.

धनू (SAGITTARIUS) : कन्या राशीचा चंद्र आज आपल्या दशमात असेल. आज यश, कीर्ती व प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल. नोकरीत वरिष्ठ खूश असल्यामुळे पदोन्नतीची शक्यता आहे. स्वास्थ्य ठीक राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वडील तसेच सरकारकडून फायदा मिळेल. आर्थिक योजना चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. व्यापारासाठी प्रवास होऊ शकतो. इतर लोकांना मदत करण्याचा प्रयत्न कराल. वैवाहिक जीवनात माधुर्य राहील.

मकर (CAPRICORN) : कन्या राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात असेल. आजचा दिवस बौद्धिक कार्य किंवा साहित्य लेखन ह्यासाठी अनुकूल आहे. व्यवसायात नवे विचार प्रवाह आणल्याने आपल्या कामाला नवे स्वरूप येईल. व्यवसाय क्षेत्रातील प्रतिकूल वातावरण मनाला अस्वस्थ करेल. शारीरिक थकवा जाणवेल. संततीच्या समस्या आपणास त्रस्त करतील. व्यर्थ खर्च होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळा.

कुंभ (AQUARIUS) : कन्या राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात असेल. आज अवैध कृत्यां पासून दूर राहावे. वाणीवर संयम ठेवल्यास पारिवारिक संघर्ष टाळू शकाल. प्रत्येक घटना व्यक्ती व वस्तू ह्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहाल. खर्च वाढल्याने आर्थिक चणचण जाणवेल. क्रोधावर संयम ठेवा. शारीरिक व मानसिक दृष्टया अस्वास्थ्य राहील.

मीन (PISCES) : कन्या राशीचा चंद्र आज आपल्या सातव्या भावात असेल. आज आपण दैनंदिन कामातून बाहेर पडून सहलीसाठी किंवा मनोरंजनासाठी वेळ द्याल. स्वजनांसह सहली साठी जाऊ शकाल. सिनेमा, नाटक किंवा बाहेर भोजन करणे असा एखादा कार्यक्रम आखाल. कलाकार किंवा कारागिराना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी मिळेल. आजचा दिवस व्यवसायात भागीदारीसाठी अनुकूल आहे. दांपत्य जीवनात अधिक जवळीक निर्माण करता येऊ शकेल. सार्वजनिक जीवनात मान – सन्मान होतील.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page