
रत्नागिरी: पाटबंधारे विभागाच्या ४९ पुर्ण झालेल्या धरण प्रकल्पांमुळे जिल्ह्यात सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. अजुनही १७ धरण प्रकल्प अपुर्ण आहे. त्यांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी पाटबंधारे विभागाने शासनाकडे २ हजार ५०० कोटीच्या निधीची मागणी केली आहे.
२०३१ पर्यंत हे सर्व धरण प्रकल्प पूर्ण होतील. जिल्ह्यातील २० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले असून भविष्यात ४५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी दिली.
जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्याच्यादृष्टीने पाटबंधारे विभागाचा प्रयत्न आहे.
त्याअनुषंगाने जिल्ह्यात मध्यम, लघु धरण प्रकल्प सुरू आहेत तर काही पुर्ण झालेले आहेत. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ४९ धरण प्रकल्प पुर्ण झाले आहेत. या धरण प्रकल्पांमुळे १५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. तर या प्रकल्पामुधुन पिण्यासाठी, संचिनासाठी आणि औद्योगिक वापरासाठी पाणी दिले जात आहे. परंतु गट शेती योजनेसाठी मात्र पाण्याचा अगदी नगण्य वापर होत आहे. तो वाढावा, यासाठी पाटबंधारे विभागाच प्रयत्न आहे. जिल्ह्यात या विभागाचे अजुन १७ धरण प्रकल्प असून ते अपुर्ण अवस्थेत आहेत. ते पुर्ण करण्याच्यादृष्टीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यातील ७ प्रकल्प दोन वर्षांमध्ये पुर्ण होतील, तर उर्वरित प्रकल्प २०३१ पर्यंत पुर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
या १७ धरण प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात म्हणजे ४१३ मिलिअन क्युबिक मीटर पाणी साठा निर्माण होणार आहे. या धरणांची २० ते ३० टक्केच्या वर कामं पुर्ण झाल्यामुळे जुन २०२५ अखेर या धरणांमध्ये २६६ मिलिअन क्युबिक मीटर एवढा पाणीसाठी झाला आहे. सध्या २० हजार हेक्टर सिंचन क्षेत्र ओलिताखाली आले असून ४५ हजार २९१ हेक्टर सिंचनाखाली आणण्याचे नियोजित आहे. अपुर्ण असलेले हे १७ धरण प्रक्लप पुर्ण करण्यासाठी २ हजार ५०० कोटीची निधीची गरज आहे. शासनाकडुन पाटबंधारे विभागासाठी दरवर्षी आर्थिक तरतुद केली जाते आणि तो निधी खर्चही होतो. साधारण यावर्षी २६० कोटीची तरतुद आहे. जिल्ह्यात नवीन कोणताही धरण प्रकल्प नाही. परंतु चिपळुण -सुतारवाडी येथील येथे एक नियोजित आहे, परंतु तो जुनाच आहे. पुनर्वसनाबाबत काही प्रश्न आहेत, परंतु ते तेवढे किचकट किंवा त्रासदायक नाहीत, सकारात्मक आहेत. पुनर्वसन आणि भूसंपादनाचे जिल्ह्यातील काम खुप चांगले आहे, असे श्री. सुर्वे यांनी सांगितले.