
चिपळूण | प्रतिनिधी: शहरातील युनायटेड इंग्लिश स्कूल प्रशालेमध्ये आज लोकनायक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात व गौरवपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. विभाकर वाचासिद्ध सर, उपमुख्याध्यापक श्री. बनसोडे सर, पर्यवेक्षिका सौ. कारदगे मॅडम, शिक्षक प्रतिनिधी श्री. मोटगी सर, शिक्षिका सौ. नाझरे मॅडम, तसेच सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छात्रस्नेही आणि समतावादी राजवटीचे अध्वर्यू असलेल्या शाहू महाराजांच्या कार्याची आठवण करून देत, विद्यार्थ्यांनी आपल्या कलेतून त्यांचे जीवनदर्शन घडवले. विद्यार्थ्यांनी रेखाटलेली शाहू महाराजांची चित्रे सामाजिक समतेचा व शिक्षणप्रेमाचा संदेश देणारी ठरली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाहू महाराजांचे कार्य व विचार समजून घेण्याची प्रेरणा निर्माण झाली.