
पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या कारवाईवर उपस्थित होत आहेत प्रश्नचिन्ह…
खोपोली/ रायगड /प्रतिनिधी- महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील लोधीवली दांडफाटा परिसरात असलेल्या समुद्रा लाईव्ह ऑर्केस्ट्रा बारबाबत प्रशासनाच्या भूमिकेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. एकीकडे बारच्या बाहेर दिनांक 15 जून 2025 रोजी रात्री बारा वाजायच्या सुमारास रायगड पोलिसांचे गाडी समुद्र बारच्या बाहेर दिसून आली. मिळालेल्या माहितीनुसार त्यादिवशी कारवाई करण्यात आली. बार मधील मुलींचे पळापळ आणि ग्राहकांची पळापळ दिसून आली. तर दुसरीकडे अद्याप कोणतीही अधिकृत कारवाई झाल्याची पुष्टी झालेली नाही. तसेच कारवायाची प्रेस नोटही काढण्यात आलेली नाही. आमच्याकडे उपलब्ध असलेल्या व्हिडिओमध्ये बार चालवणारे विलास पाटील दिसून आलेले आहेत. त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली की कारवाईचा फास केला असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. सदर घटनेमुळे जनतेमध्ये संताप आणि अविश्वास सतत वाढत आहे.
15 जून रोजी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत पोलिसांच्या कारवाईवर टीका…
खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील 15 जून रोजी पोलिसांची गाडी रात्री उशिरा दिसून आली सदर वेळेला समुद्र बारवर कारवाई करण्यात आली. पण कारवाईचे पुढे काय झाले हे आज रोजी प्रश्नचिन्हच आहे. केलेल्या कारवाईनंतर राजरोसपणे काल रात्री समुद्र डान्सबार चालू होता. अनेक ठिकाणी कारवाई झाली नाही की पोलिसांनी सेटिंग केलं याची चर्चा चालू आहे.
सबकुछ सेटिंग है, हायवे वरती सदर तिने बार असूनही कारवाई होत नसल्याने उपस्थित होतो प्रश्न…
सद्यस्थितीला समुद्र बार विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालवला जात आहे मिळालेल्या माहितीनुसार विलास पाटील यांनी सदरचा बार पार्टनरशिप मध्ये चालवायला घेतलेला आहे. ज्या दिवशी पोलीस बरोबर आले होते त्या दिवशी विलास पाटील हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. विलास पाटील याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाच्या गुटक्याच्या व्यवहारांमध्ये ही मागे त्याच्यावर कारवाई झाली होती. बेकायदेशीर स्टीलचा व्यापार, आणि बेकायदेशीर डिझेल विक्रीमध्ये हे त्याचे हात असल्याचे आमच्या सुत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे त्या रात्री झालेल्या कारवाईचे पुढे काय झाले ही सेटिंग झाली. यावर उलट सुलट चर्चा चालू आहे. या विरुद्ध लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.

रायगड एस. पी.यांनी केलेले अनधिकृत धंदे बंद करण्याचे आव्हान हवेतच.
रायगडच्या एसपी आचंल दलाल यांनी रायगडचा पदभार स्वीकारताना रायगड मधील अनधिकृत धंदे बंद करणार असल्याचे सांगितले होते परंतु रायगड मधील पनवेल, कोंडगाव, खोपोली, पनवेल शहर डान्सबार जोरात चालू आहेत. यावरून त्यांचे खालील अधिकारी त्यांनी दिलेले निर्देश पाळत नसल्याचे दिसून येत आहे. कारवाईच्या नावावर फक्त कागदपत्रे घोडे नातवत असल्याचे दिसत आहे. सदर घडलेल्या घटनेमुळे खोपोलीचे पोलीस निरीक्षक सचिन पवार आणि चौक दूरशेत्र चे पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. हायवे वरती सदरचे बार असू नये उशिरापर्यंत सदरचे बार चालू असतात बारमध्ये सीसीटीव्ही लावणे बंधनकारक असताना ते दिसून येत नाहीत. तसेच सर्व नियमांचे उल्लंघत होत असताना पोलिसांची भूमिका ही बघायची असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एसपी यांनी केलेले वक्तव्य खालील अधिकारी यांच्यामध्ये तफावत असल्याचे दिसून येत आहे. च्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे. सर्व प्रकारचे बेकायदेशीर आणि अनधिकृत धंदे रायगड मध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.
खोपोलीतील तिन्हीबार वर सगळ्या नियमांचे उल्लंघन…
खोपोली तालुक्यातील समुद्र पूनम आणि स्वागत बारमध्ये मोठ्या प्रमाणात मुलींवर पैसा उडवला जातो. नियमाप्रमाणे स्टेज बांधून सीसीटीव्हीच्या निगराणी मध्ये त्यांनी डान्स केलं पाहिजे. परंतु बार मालकांच्या व चालकांच्या मनमानी कारभारामुळे मध्यभागी त्यांना डान्स करायला भाग पाडले जाते. अश्लील चाळे हे केले जातात. मोठ्या प्रमाणात पैसा उडवला जातो. बारमध्ये विक्री केलेल्या दारू पाणी बॉटल थंडा यांच्या किमतीही प्रचंड प्रमाणात वसूल केले जातात. डान्सबार मध्ये ऑर्केस्ट्रा साठी घालून दिलेल्या अटी व शर्तीचा भंग होत असूनही पोलिसांना सर्व माहीत असूनही कारवाई करत नाही. तसेच सर्व प्रकारचे अनधिकृत वाढली गलधंदे चालवले जातात. तसेच रात्री डान्सबार बंद झाल्यानंतर आजूबाजूच्या हॉटेलमध्ये सदर मुली ग्राहक घेऊन जातात पनवेल मधील हॉटेल किनारा आणि वेलवेट रात्री पाच ते सहा वाजेपर्यंत चालू असते. याचा पूर्ण वृत्त दबाव च्या हाती असून लवकरच मुख्यमंत्र्यांकडे याची तक्रार करणार असल्याचे समजते.
मानवी हक्काचे वारंवार उल्लंघन होऊनही कारवाई नाही…
सदर बार मध्ये काम करणाऱ्या मुली यांना फसवणूक करून एजंट लोकं मुलींना घेऊन येतात. त्यांच्या आर्थिक कमजोरीचा फायदा उठवून त्यांना बार मध्ये नाचण्यासाठी भाग पाडले जाते. पनवेल परिसर, करंजाडे, इंडियाबुल्स आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सदरच्या मुलींना एजंट लोक पीजी मध्ये ठेवतात. असे विश्वासनीय सूत्रांकडून कडून माहिती आहे. अनेक मुली ह्या बांगलादेशी असून कुठे आधार कार्ड बनवून देऊन त्यांना बार मध्ये संधी दिली जाते. त्यामुळे आधार कार्ड व त्यांच्या कार्डचे व्हेरिफिकेशन होणे फार गरजेचे आहे. डान्सबार मध्ये उडणारा पैसा हा बेकायदेशीर असून अनधिकृत धंद्यातून येत असल्याचे समजते. त्यामुळे तेथील मुलींचे गुगल पे अकाउंट चेक करावेत असेही मागणे सामाजिक कार्यकर्ते करणार आहेत.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या दिलेल्या इशाऱ्यानंतर राजरोसपणे डान्सबार चालू..
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नवी मुंबईतील वाशी इथल्या अनधिकृत डान्स बारवर धाड टाकली. ‘द रेस’ अस या डान्सबारचे नाव आहे.तोकड्या कपड्यांमध्ये बारगर्ल अश्लिल नृत्य करत असल्याचे दिसून आले. यावेळी 40 बारगर्ल आणि 6 वेटर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला. महाराष्ट्रात अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे डान्स बार सुरु असतील तर ते तातडीने बंद करावेत. अन्यथा कडक करावाई केली जाईल अशा इशारा देखील गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिनांक 28 मे 2025 रोजी नवी मुंबई येथील बारवर कारवाई करतेवेळी दिला आहे. 2005 मध्ये माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी महाराष्ट्रातील डान्स बार बंद केले. आर. आर. पाटील यांनी असाच प्रकारे डान्सबार छापेमारी केली होती. डान्सबारमुळे तरुण पिढी बर्बाद होत आहे. यामुळे कायद्याने डान्स बारवर बंदी घालण्यात आली आहे. असे असताना अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे डान्स बार सुरु आहेत.
22 फेब्रुवारी 2025 रोजी समुद्राबारवर खोपोली पोलिसांनी कारवाई केली परंतु आजही समुद्रा ,पुनम आणि स्वागत बार चालू…
22 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री उशिरा समुद्रा पूनम व स्वागत डान्सबार खोपोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलिसांनी कारवाई केली होती. ऑर्केस्टाच्या नावाखाली अश्लिल हावभाव करुन वीभत्स नृत्य करणार्या खालापूर तालुक्यातील तीन डान्सबारवर रायगड स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला होता. यामध्ये ३२ बारबालांसह ४० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. रायगडचे त्यावेळचे रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी अवैध धंद्याविरोधात मोहिमच उघडली होती.
तालुक्यातील कलोते गावाच्या हद्दीत असलेल्या स्वागत, पूनम आणि लोधिवली येथे ऑर्केस्टा बारमध्ये मनोरंजनाच्या नावाखाली गैरप्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांची टिम कामाला लागली. शनिवारी, २२ फेब्रुवारी रोजी रात्री हॉटेल समुद्रा येथे पोलिसांनी धाड टाकली होती.
याठिकणी राहुल नरेश यादव याच्यासह ८ बारबाला, ७ ग्राहक तसेच ७ अन्य कर्मचारी असे २२ जणांवर कारवाई करण्यात आली. दुसरी कारवाई स्वागत हॉटेलवर करण्यात आली. याठिकाणी मिरा खातून सुखचंद शंखेब हिच्यासह १२ बारबाला, १० ग्राहक तसेच सहा कर्मचारी असे २८ जण आढळून आले. तर पुनम बार तोश संजिवा मोगवीरा याच्यासह १२ बारबाला, ७ ग्राहक आणि ३ कर्मचार्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लेडीज बारवरील या कारवाईमुळे बार मालकांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल गोसावी, पोलीस निरीक्षक रुपेश नरे, पोलीस उपनिरीक्षक लिगण्या सरगर, पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक राजेन पाटील, सहा. पोलीस उपनिरीक्षक प्रसत्र जोनी यांच्यासह अन्य कर्मचारी तसे एक बांगलादेशी पथक सहभागी झाले होते. परंतु सदर कारवाईनंतर काय झाले किती बांगलादेशी महिला सापडल्या याचे कोणतेही उकल झालेला नाही. परत राजरोसपणे तीनही डान्सबार चालू आहेत.