देवरूखमधील चक्रभेदी सोशल फाउंडेशनतर्फे आंतरराष्ट्रीय विधवा दिवस उत्साहात साजरा,विधवा महिलांच्या मुलांना केले शैक्षणिक साहित्य वाटप…

Spread the love

देवरूख- चक्रभेदी सोशल फाउंडेशन, देवरुख या सामाजिक संस्थेच्या वतीने २३ जून आंतरराष्ट्रीय विधवा दिवस साजरा करण्यात येतो. 23 जून रोजी विधवा महिलांच्या  १० मुलांचे शैक्षणिक पालकत्व देवरुख मधील संवेदनशील व्यक्तींनी घेतले तसेच संस्थेने शैक्षणिक साहित्य जमवून त्याचे वाटप व विविध स्पर्धा, प्रबोधन असा भरगच्च कार्यक्रम 26 जून 2025 रोजी छत्रपती संभाजी महाराज सभागृह, पंचायत समिती देवरुख येथे घेऊन आंतरराष्ट्रीय विधवा दिवस साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात जि. प. आदर्श शाळा क्र. ४,देवरुख येथे मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेले मा. संभाजी पाटील सर यांचे नुकतेच निधन झाले त्यांना सर्वांनी २ मिनिट स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. नंतर गटविकास अधिकारी मा. श्री. विनोदकुमार शिंदे साहेब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन  करण्यात आले. यानंतर राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, मातृमंदिर संस्थापिका मावशी हळबे व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला पंचायत समिती संगमेश्वरचे मा. श्री. कदमराव साहेब कक्ष अधिकारी, मा. श्री. घुले साहेब विस्तार अधिकारी,  मा. श्री. युयुत्सू आर्ते साहेब सामाजिक कार्यकर्ते,  मा. श्री. दीपक फेपडे सामाजिक कार्यकर्ते,  मा. श्री. रावसाहेब चौगुले, श्री. गोपाळ लिंबुकर, श्री. गोविंद लोकम, तसेच कनिष्ठ सहाय्यक लेखा मा. सौ. वैदेही किरवे, चक्रभेदी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा मा. सौ. वैदयही सावंत मॅडम उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे संस्थेच्या  वैदेही सावंत मॅडम यांनी स्वागत केले.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मा. श्री. विनोदकुमार शिंदे साहेब यांनी उपस्थित विधवा महिलांशी संवाद साधत त्यांना भाऊ म्हणून सदैव त्यांच्या सोबत असल्याची ग्वाही दिली. तसेच, “विधवा महिलांना समाजात समान मान आणि प्रतिष्ठा मिळाली पाहिजे,”यासाठी आमच्याकडून होतील तेवढे प्रयत्न करू असे सांगितले त्यांचे मनोगत ऐकताना महिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू अनावर झाले. संस्थेच्या वैदेही सावंत यांनी “नवरा वारला यात तुमची काही चूक नाही त्याची शिक्षा आयुष्यभर भोगण्याची गरज नाही “असे मत मांडले व आज तुमचा दिवस आहॆ तूम्ही बोलायचे आहॆ सांगून महिलांना बोलते केले. संस्थेच्या वतीने विधवा महिलांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. लाभार्थ्यांमध्ये आर्या साळवी, प्रणाली पवार, विनोद मोहिरे, अमिता शिंदे, पूर्वा लिंबुकर, मानसी जाधव, सुलभा साळवी, साक्षी कदम, सुनीता मोहिरे, प्रवीण तेरवकर, खतीजा साटविलकर, शर्मिला गेल्ये, स्नेहा गुरव व श्रुतिका भोई, आश्लेषा इंगवले इ.चा समावेश होता.

कार्यक्रमानंतर उपस्थित सर्वांनी सामूहिक भोजनाचा आस्वाद घेतला. दुपारी महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत कविता काजरेकर (प्रथम), श्रद्धा प्रसादे, साक्षी कदम व शबाना खतीब यांनी अनुक्रमे नंबर पटकवला.  विजेत्या चारही महिलांना साडी बक्षीस देण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विधवा महिलांनी मनोगत व्यक्त करताना समाजात अजूनही विधवा महिलांना विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांत कमी प्रमाणात सामावून घेतले जाते, आम्हाला कमीपणाने वागवले जाते यावर भाष्य केले. “अनिष्ट विधवा प्रथा नष्ट व्हाव्यात” यासाठी शासनाचे प्रयत्न असून, गाव पातळीवर ग्रामपंचायतींनी यामध्ये पुढाकार घ्यावा आणि ग्रामपंचायत च्या माध्यमातून वाडी प्रमुखांना, सरपंच यांना अंमलबजावणी ची लेखी समज द्यावी अशी मागणी करण्यात आली. यासाठी मा. गटविकास अधिकारी यांना सर्वांनी मिळून निवेदनही देण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप मान्यवरांचे व उपस्थित महिलांचे चक्रभेदी सोशल फाउंडेशनच्या मा. वैदेही सावंत मॅडम यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पूजा जागुष्टे, आश्लेषा इंगवले यांनी परिश्रम घेतले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page