मातोश्री परिसरात झळकले मंत्री नितेश राणेंना शुभेच्छा देणारे बॅनर,बॅनरवर नितेश राणेंचा वस्ताद असा उल्लेख….

Spread the love

मुंबई/प्रतिनिधी:- महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरविकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना २३ जून रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर आजपासूनच झळकू लागले आहेत. विशेष म्हणजे मातोश्रीच्या परिसरात लावण्यात आलेला एक बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात असलेले विळी भोपळ्याचे नाते अवघ्या महाराष्ट्राला अवगत आहे. अशातच काही दिवसांपूर्वी झालेल्या शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वर्धापन दिनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंत्री नितेश राणे यांच्यावर सडकून टीका केली होती. तर आज मंत्री नितेश राणेंना शुभेच्छा देणारा बॅनर वांद्रे कलानगर येथील मातोश्रीच्या परिसरात झळकल्यामुळे हा बॅनर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

हिंदू गब्बर कॅबिनेट मंत्री मा. श्री. नितेश नारायण राणे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशा आशयाचा बॅनर मातोश्री परिसरात लावण्यात आला आहे. या बॅनरवर नितेश राणे यांचा वस्ताद असा उल्लेख करण्यात आला आहे. उत्तर मध्य मुंबईचे जिल्हा उपाध्यक्ष मयुर मंगल बागेरिया यांनी हा बॅनर लावला असून हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page