
मुंबई :- कोकणातील चिपळूण तालुक्यातील दहिवली बुद्रुक गावचे रहीवाशी उद्योगपती पद्माकर दत्ताराम घाग यांचे सुपुत्र सोहम पद्माकर घाग याने युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया (UCLA) मधून मास्टर डिग्री इन आर्किटेक्चर अँड अर्बन डिझाईनिंग ही पदवी संपादन करून दहिवली बुद्रुक गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा मिळवून दिला आहे.
सोहम याने आर्किटेक्चर चे शिक्षण मुंबईमध्ये घेऊन पुढील शिक्षण स्कॉलरशिप मिळवून अमेरिका सारख्या देशामधील प्रख्यात कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी मधून मास्टर डिग्री इन आर्किटेक्चर अँड अर्बन डिझाईनिंग ही पदवी संपादन केली.
त्याच्या या यशामध्ये आई वडील व बहीण डॉक्टर (अमेरिका) यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
त्याच्या या यशाबद्दल दहिवली पंचक्रोशी, मुंबई स्थित नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.