
संगमेश्वर : अर्चिता कोकाटे/ नावडी- संगमेश्वर येथे ओम साई गणेश मित्र मंडळ सांताक्रुज मुंबई यांच्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून कोकणामध्ये संगमेश्वर, कनकाडी, दाभोळे आदी विविध शाळा व अंगणवाडी येथे शालेय उपयोगी साहित्य, वहया, पेन, तक्ते, रंग भरणवही आधी संच तसेच खाऊवाटप करण्यात आले.
रामपेठ अंगणवाडी सेविका पल्लवी शेरे यांनी मंडळाचे अध्यक्ष सुधीर माने यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. मान्यवर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन शेरे, साई मंडळाचे सेक्रेटरी सतीश सावंत व खजिनदार नरेश सुवरे व सुवरे मॅडम पदाधिकाऱ्यांचे स्वागत मदतनिस शितल अंब्रे यांनी केले.







पंधरा मुलांना साहित्याचे वाटप ओम साई गणेश मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले. पत्रकार व कायदा साथी यांच्या प्रयत्नातून मुंबई मंडळात संपर्क साधून हा स्तुत्य उपक्रम संपन्न झाला.
अंगणवाडीत भेटवस्तू म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली.कार्यक्रमाचे आभार शीतल अंब्रे यांनी मानले.
रामपेठ अंगणवाडी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न…
21 व्या योग दिनानिमित्त राम पेठ अंगणवाडी येथे योग दिन संपन्न झाला. यावेळी मुलांना योगाची प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली. मुलांनीही आवडीने योग केला. योगाचे फायदे व त्यामागील इतिहासाची परिपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. सदर कार्यक्रमास विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते. राम पेठ अंगणवाडी विविध कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. वेगवेगळे शासकीय कार्यक्रम करून पंचक्रोशी मध्ये रामपेठ अंगणवाडी चे एक वेगळे नाव प्रस्थापित झाले आहे.