
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्र.१५३ (चेंबूर विधानसभा) व स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने व मनसेचे गड क्र.१५३ चे शाखाध्यक्ष श्री.रोहिदासजी जाधव यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार शिवजयंती अतिशय धुमधडाक्यात साजरी करण्यात आली यावेळी श्री.किशोरजी घाग यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व स्वामी मुक्तानंद हायस्कूल च्या माजी शिक्षिका श्रीमती कुसुम विलासराव चौधरी मॅडम यांनी जमलेल्या जनसमुदायला शिवचरित्र बद्दल प्रबोधन केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना गड क्र.१५३ तर्फे “मराठी भाषा दिनानिमित्त” इयत्ता १ लि ते ७ विच्या विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धा व इयत्ता ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेला ३०० हुन अधिक विध्यार्थीनी भाग घेतला होता त्या विजेत्या स्पर्धकांना “शिवजयंती” रोजी पारितोषिक वितरित करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला मनसेचे नेते,सरचिटणीस श्री.शिरीषजी सावंत , उपाध्यक्ष श्री. नवीनजी आचार्य , विभाग अध्यक्ष श्री.विजयजी गर्जे , महिला विभाग अध्यक्ष सौ. वीणाताई उकरंडे ,माजी विभागअध्यक्ष श्री.कर्णबाळाजी दुनबळे , मनसे विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष कु. सुधान्शु दुनबळे, उपविभाग अध्यक्ष श्री.अविनाशजी पांचाळ , महिला उपविभाग अध्यक्ष सौ.सविता ताई खैरे , स्थानिक महिला शाखाध्यक्षा रेश्मा ताई राऊत , वाहतूक सेनेचे श्री.माऊलीजी थोरवे , श्री.अनिलजी साळवी, जनहित व विधी विभागाचे सरचिटणीस adv. सचिनजी काळे, सहकार सेनेचे मुन्नावर पवार तसेच इतर वरिष्ठ पदाधिकारी व महाराष्ट्र सैनीक यांनी हजेरी लावली.