आजोबांनी पूर्ण केले सोन्याची माळ घेण्याचे आजीचे स्वप्न; ज्वेलर्स मालकाचा मनाचा मोठेपणा पाहून आजी-आजोबांचे पाणावले डोळे…

Spread the love

छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या एका ९३ वर्षीय आजोबांनी आपल्या पत्नीसाठी (आजीसाठी) सोन्याची माळ घेण्याचे स्वप्न पूर्ण केले. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्याजवळील थोडेफार पैसे आणि कापडात गुंडाळलेले पैसे घेऊन एका ज्वेलर्सच्या दुकानात गेले. दुकान मालकाने त्यांचे प्रेम पाहून, त्यांना मदत केली आणि आजीसाठी आजोबांनी सोन्याची माळ घेतली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि लोकांना खूप भावूक करत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये, 93 वर्षांचे आजोबा आपल्या पत्नीसाठी सोन्याची माळ घेण्यासाठी एका ज्वेलर्सच्या दुकानात जातात. त्यांच्याजवळ जास्त पैसे नसतानाही, ते आपल्या पत्नीसाठी काहीतरी खास करण्याची इच्छा व्यक्त करतात. दुकान मालकाने त्यांची भावना ओळखली आणि त्यांना मदत केली. आजोबा आणि आजीचे प्रेम पाहून दुकान मालकानेही मुलाप्रमाणे कर्तव्य बजावले. आजी-आजोबांच्या एका मुलाचे निधन झाले आहे, तर दुसरा मुलगा व्यसनाधीन आहे. त्यामुळे, दुकानदाराने त्यांना मदत करून त्यांचे स्वप्न पूर्ण केले. हा व्हिडिओ पाहून लोकांना खूप आनंद झाला आहे. अनेकांनी दुकानदाराच्या या कृतीचे कौतुक केले आहे.

https://www.instagram.com/reel/DK7R-XJzC2g/?igsh=ajFxdGl0OWFjamV2

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरमधील गोपिका ज्वेलरी या दुकानातील आहे. गोपिका ज्वेलरी संभाजीनगरच्या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडिओत प्रेम आणि माणुसकीचे दर्शन होते. या व्हिडिओत दिसणारे 93 वर्षीय आजोबा आपल्या पत्नीसाठी सोन्याच्या वाट्या घेण्यासाठी दुकानात येतात. यावेळी दुकान मालक त्यांची आपुलकीने विचारपूस करतो. आजींकडे फक्त 1100 रुपये असतात, तर आजोबांकडे कापडात गुंडाळलेले थोडे फार पैसे असतात. पण, ज्वेलर्स त्यांच्याकडून पैसे घेण्यास नकार देतो. तो म्हणतो, पैसे नका देऊ, दागिने असेच घेऊन जा. मला फक्त तुमचा आशीर्वाद हवाय. पण, आजोबा-आजी पैसे घेण्याची विनंती करतात. शेवटी ज्वेलरी मालक त्यांची विनंती मान्य करतो आणि त्या वृद्ध जोडप्याकडून फक्त 20 रुपये घेतो. पांडुरंगाचे आणि तुमचे आशीर्वाद असल्यावर काय कमी पडतंय, असे तो दुकान मालक म्हटल्याचे व्हिडिओत ऐकू येते. ज्वेलर्स मालकाने दाखवलेल्या या दिलदारपणाबद्दल त्याचे कौतुक होत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page