
रत्नागिरी दि १५ जून – राजापूर येथील महाकाली मंदिर आडिवरे परिसरात भरलेल्या पावसाच्या पाण्याची आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी भाजपा द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह भाजपा पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी अडिवरे येथे भेट दिली. प्रशासकीय अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार यांच्या भेटी घेण्यात आल्या व तेथे झालेल्या नुकसानीची पाहणी करून संबंधितांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाकडे सादर करावे अशा सूचना दिल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह प्रदेश पदाधिकारी शिल्पा मराठे, जिल्हा सरचिटणीस अमित केतकर, बाळ दाते, वसंत पाटील, धनंजय मराठे, मंदार खंडकर, राजेंद्र फाळके, समीर सावंत तेथील स्थानिक ग्रामस्थ भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते स्थानिक सरपंच उपस्थित होते.