रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी तालुका व शहर च्या वतीने तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. यानिमित्त भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते..यानंतर मारूती मंदीर येथील शिवछत्रपतींच्या अश्वारूढ प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना रत्नागिरी तालुक्याच्या वतीने तालुका संपर्क कार्यालयात महिला भगिनींचा पक्षप्रवेश पार पाडला.
या कार्यक्रमास द. रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष श्री. रूपेशजी सावंत, रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री.रूपेश जाधव, शहराध्यक्ष श्री. सतीशजी राणे, तालुका उपाध्यक्ष श्री. राजू पाचकुडे, महिला सेना तालुकाध्यक्ष सौ. प्रियांकाताई आखाडे, तालुका सचिव सौ. आकांक्षाताई पाचकुडे, शहर अध्यक्षा सौ. अंजलीताई सावंत, शहर उपाध्यक्ष श्री. अमोल श्रीनाथ, श्री. अनंत शिंदे, माजी जिल्हा सचिव श्री. बिपीनजी शिंदे , श्री. सत्यविजय खाडे, श्री. सागर पावसकर, श्री. विशाल चव्हाण, श्री. सोम पिलणकर, श्री. नवनाथ साळवी, श्री. राहुल खेडेकर आदींसह तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जाहिरात