निलेश राणे यांची शिवसेना संपर्क कार्यालयात भेट; संघटना वाढीबाबत चर्चा..

Spread the love

चिपळूण: कुडाळ विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि माजी खासदार निलेश राणे यांनी रविवारी शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्या संपर्क कार्यालयात भेट दिली. या भेटीदरम्यान संघटना वाढ, आगामी राजकीय दिशा आणि कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर सविस्तर चर्चा झाली. शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी आमदार राणे यांचे औपचारिक स्वागत केले.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख संदेश आयरे, माजी नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे, माजी नगरसेवक परिमल भोसले, दिलीप चव्हाण, महम्मद फकीर, करामत मिठागरी, युवासेना तालुका प्रमुख निहार कोवळे, शहरप्रमुख विनोद पिल्ले, उपशहरप्रमुख सुयोग चव्हाण, तसेच प्रमोद बुरटे, विकी लवेकर, संदेश गोरिवले, नयन चव्हाण, फैसल मेमन, दयानंद जुवळे, अमेय चितळे, सुजित पाकटे, मंगेश कदम, अर्जुन शिंदे, शुभम पिसे, संदेश भालेकर, प्रफुल्ल पिसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महिला आघाडीकडून जिल्हाध्यक्षा सौ. रश्मीताई गोखले, शहराध्यक्षा सौ. प्राजक्ता टकले, सौ. राणी महाडिक, सौ. प्रिया शिंदे, सौ. आरती महाडिक, सौ. सुवर्णा साडविलकर, सौ. तृप्ती कदम, सौ. दिशा किंजळकर, सौ. पूर्वा तांदळे, सौ. श्रद्धा कदम यांनी सहभाग घेतला.

या बैठकीत पक्ष संघटनेच्या विस्ताराच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. कार्यकर्त्यांच्या मतांचा सन्मान ठेवत एकसंघपणे आगामी राजकीय वाटचालीसाठी सज्ज राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page